आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ATM बाहेर राहुल गांधींनी लोकांशी साधला संवाद, \'नोटाबंदी\'वरून आपापसात भिडले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी भल्या पहाटे राजधानीतील जहांगीरपुरा परिसरातील एटीएमबाहेर रांगा लावून उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आश्चर्ययाची गोष्ट म्हणजे, मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य, यावरुन दोघांमध्ये राहुल गांधी यांच्या समोरच कडाक्याचे भांंडण झाले. अखेर राहुल यांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण सोडवले. दरम्यान, यापूर्वी राहुल गांधी यांनी मुंबईत एटीएमबाहेर लोकांशी संवाद साधला होता.

बॅंकेच्या लाइनमध्येही दिसले होते राहुल
- राहुल गांधी, नोटा बदलण्यासाठी बँकेत आलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेताना दिसले होते.
- राहुल यांनी यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशभरात नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
- मोदी सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांनाच त्रास होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज...मस्यांविषय़ी आणि होणाऱ्या त्रासाविषयी राहुल गांधींनी लोकांशी संवाद साधला.
बातम्या आणखी आहेत...