आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींच्या चिनी राजदूत भेटीने वादंग; काँग्रेसकडून आधी नकार, नंतर सदिच्छा भेटीची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-चीनमध्ये खडाजंगी सुरू असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतातील चीनचे राजदूत लु झाओहुई यांची भेट घेतल्याचे वृत्त सोमवारी आले. काँग्रेसने आधी या बातम्या दाखवणाऱ्या चॅनल्सला ‘भक्त’ संबोधत त्याचे खंडन केले.मात्र, सहा तासांनंतर ही भेट झाल्याची कबुलीही दिली. 
 
चिनी दूतावासाने ८ जुलैला झालेल्या या भेटीची माहिती दिली होती. प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले, राहुल यांनी भूतानचे राजदूत, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांचीही भेट घेतली होती. मात्र या भेटीच्या एका दिवसाआधी त्यांनी पंतप्रधान मोदींवर चीन मुद्द्यावर मौन साधल्याबद्दल टीका केली होती.
 
तीन केंद्रीय मंत्री चीनला काय करताहेत : राहुल 
राहुल गांधी म्हणाले, ‘गंभीर मुद्द्यांवर माहिती घेणे हे माझे काम आहे. मी चीनचे राजदूत, माजी एनएसए, ईशान्य भारतातील काँग्रेस नेते, भूतानच्या राजदूतांना भेटलो होतो. माझ्या भेटीबद्दल सरकार इतके चिंताक्रांत असेल तर तीन केंद्रीय मंत्री चीनमध्ये पाहुणचार का घेत आहेत?’
बातम्या आणखी आहेत...