आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्रभाई.. गळाभेट कामी आली नाही; हाफीज सईदच्या सुटकेवरुन राहूल गांधींची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदच्या पाकिस्तानातील सुटकेवरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. शनिवारी एका ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणाले, नरेंद्रभाईंची डोनाल्ड ट्रम्पबरोबरची गळाभेट काही फायद्याची ठरली नाही. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानने लश्करलला निधी दिल्याच्या आरोपात क्लीनचीट दिली आहे. दहशतवादी सईद 10 महिन्यांच्या नजरकैदेनंतर गुरुवारी रात्री मुक्त झाला. त्यानंतर त्याने केक कापत आनंदही साजरा केला. 

 

राहुल गांधींनी केलेले ट्वीट.. 
- राहुल गांधींनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले, नरेंद्रभाई, बात नहीं बनी.. दहशतवादाचा मास्टरमाइंड मोकळा आहे. ट्रम्पने पाकिस्तानकडून लश्करला निधी दिल्याच्या आरोपात क्लीनचीट दिली आहे. गळाभेट घेण्याची पॉलिसी अपयशी ठरली आहे. लगेचच आखी गळाभेट घेण्याची गरज आहे. 
- पाकिस्तानी लष्करावर अनेकदा दहशतवादासाठी निधी पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण नुकतीच अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराला या प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे भारताला मोठा धक्का पोहोचला आहे. 


हक्कानी विरोधात कारवाई, लश्करचे नाव नाही 
न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या संसदेने एख विधेयक पास केले आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानी लष्कराला हक्कानी नेटवर्क विरोधात कारवाई करावी लागणार आहे. या कामात त्याला अमेरिकन लष्कर आणि अफगाणिस्तानातील लष्कराची मदत मिळेल. यामध्ये लश्कर एत तोयबाच्या विरोधात कारवाईचा मात्र उल्लेख नव्हता. 


अमेरिकेने सईदबाबत काय म्हटले.. 
- न्यूज एजन्सीनुसार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हेथर न्यूर्ट म्हणाले होते की, लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईजच्या सुटकेबाबत अमेरिका चिंतेत आहे. पाकिस्तान सरकारने त्याला अटक करून त्याच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा द्यावी. 
- लश्कर ही एक जागतिक दहशतवादी संघटना आहे. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत अनेक निर्दोषांचा बळी घेतला आहे. त्यात अनेक अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. दहशतवादी हाफिजवर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीसही जाहीर केले आहे. 

 

पुढे पाहा, राहुल गांधींचे ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...