आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल जानवेधारी हिंदू, काँग्रेसचे स्पष्टीकरण; नरेंद्र मोदींच्या \'त्या\' वक्तव्यावरून वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोरबी/सोमनाथ- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बुधवारी सौराष्ट्रात होते. मोदी चार सभांतून गांधी-नेहरू कुटुंबावर तुटून पडले. तर, राहुल यांनी मोदी उत्तम अभिनेते असल्याचे सांगत ते करत असलेल्या दाव्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल यांनी सोमनाथाचे दर्शन घेत प्रचाराचा श्रीगणेशा केला.

 

दरम्यान, राहुल यांचे नाव सोमनाथ मंदिरातील बिगर हिंदूंसाठी असलेल्या वहीत नोंद असल्याची बातमी आली आणि वाद पेटला. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ‘राहुल यांच्यासाठी तर धर्म हा सोयीचा विषय आहे, श्रद्धेचा नव्हे. आता राहुल म्हणतात हा कट आहे.

 

भाजपचा आरोप...राहुलच्या कटाचा पर्दाफाश, ते नास्तिक आहेत
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘राहुल जानवेधारी हिंदू आहेत. त्यांना एंट्री रजिस्टर दिले नाही, स्वाक्षरीही त्यांची नाही. त्यांनी व्हिजिटर्स बुकात एंट्री केली.’ काँग्रेसचे माध्यम समन्वयक मनोज त्यागींनी रजिस्टरमध्ये एंट्री केली होती.

 

... आणि ही मंदिराच्या व्हिजिटर्स बुकातील राहुल यांची एंट्री, स्वाक्षरी रजिस्टर व्हिजिटर्स बुकातील लिहिण्याची शैली वेगवेगळी आहे. रजिस्टरमध्ये राहुल यांची एंट्री. यात राहुल गांधीजी लिहिले आहे. खाली अहमद पटेलांचेही नाव आहे. त्यागींनी ही एंट्री केली होती.

 

मोदींनी कृतीसह सांगितली कहाणी

मोरबी येथील सभेत मोदींनी सांगितले, ‘मच्छू बंधारा फुटल्यानंतर मोरबीच्या दौऱ्यावर आलेल्या राहूल यांच्या आजी इंदिरांनी येथील दुर्गंधीमुळे तोंडाला रुमाल लावला होता. मात्र याच वेळी संघाचे कार्यकर्ते चिखल घाणीची पर्वा करता बचावकार्यात गुंतले होते. एका गुजराती मासिकाने ‘इंदिरांच्या फोटोवर राजकीय अस्वच्छता सेवारत असलेल्या संघ कार्यकर्त्यांच्या फोटोवर ‘माणुसकीचा सुगंध’ असे शीर्षक दिले होते. आम्ही म्हणतो काँग्रेस हाच एक कट आहे. राहुल तर नास्तिक आहेत.

 

मोदींचा दावा: दुर्गंधीमुळे इंदिरांनी तोंडाला लावला होता रुमाल
गुजरातेत 11 ऑगस्ट १९७९ मध्ये मच्छू धरण फुटल्याने एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा चौधरी चरणसिंह पंतप्रधान होते. गुजरातेत जनता पार्टी सत्तेत होती. इंदिरा गांधींच्या 16 ऑगस्टच्या दौऱ्यानंतर एका मासिकाने दोन छायाचित्रे प्रकाशित केली होती. पहिल्यात इंदिरांच्या तोंडाला रुमाल होता तर दुसऱ्या छायाचित्रात मृतदेह घेऊन जाणाऱ्या संघ कार्यकर्त्यांच्या तोंडालाही रुमाल बांधण्यात आला होता. छायाचित्रावर लिहिले होते- ‘मोरबीनु जलतांडव’, आणि खाली नमूद केले होते, ‘गंधाती पशुता, महकती मानवता.’

 

80 ते 100 जागांवर मंदिरांचा प्रभाव...
गुजरातमधील 182 पैकी 80 ते 100 जागांवर मंदिरांचा प्रभाव आहे म्हणूनच भाजप-काँग्रेसचे नेते सतत दर्शनासाठी येत आहेत. राहुल यांनी गेल्या दीड महिन्यांत 22 मंदिरांत दर्शन घेतले आहे.

 

भुजमध्ये दर्शन घेऊन केली होती प्रचाराची सुरुवात..

- नरेंद्र मोदींनी भुजमध्ये आशापुरा देवीच्या मंदिरातून प्रचाराची सुरुवात केली होती.
- राहुल गांधींनी द्वारकामध्ये दर्शन घेत नवसर्जन यात्रा सुरू केली होती.
- राहुल गांधींनी द्वारकाधीश, कागवडमधील खोडलधाम, नाडियाडचे संतराम मंदिर, पावागड महाकाली, नवसारीतील ऊनाई माता मंदिर, अक्षरधाम मंदिर, बहुचराजी मंदिर, कबीर मंदिर, चोटिला देवी मंदिर, दासी जीवन मंदिर, राजकोटमधील जलाराम मंदिर, वलसाडचे कृष्णा मंदिर यासह लहान मोठ्या मंदिरांत राहुल गांधींनी दर्शन घेतले.


मंदिरांवरून राजकीय वक्तव्ये...
- नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही चांगल्या चांगल्या लोकांना मंदिरात जायची सवय लावली आहे.
- राहुल म्हणाले, मी शिवभक्त आहे आणि सत्यावर माझा विश्वास आहे.

 

मंदिरांच्या मतदारसंघांत कोणी मिळवला विजय

 

मंदिर मतदारसंघ 2012 2007 2002 1998
चोटिला चोटिला भाजप काँग्रेस इतर इतर
द्वारका द्वारका भाजप भाजप काँग्रेस काँग्रेस
सोमनाथ सोमनाथ काँग्रेस भाजप काँग्रेस काँग्रेस
डाकोर नडियाड भाजप काँग्रेस काँग्रेस काँग्रेस
अंबाजी दांता काँग्रेस काँग्रेस काँग्रेस काँग्रेस
पावागड हालोल भाजप भाजप भाजप भाजप
पालिताणा पालिताणा काँग्रेस भाजप भाजप भाजप
गिरणार जुनागड भाजप भाजप भाजप भाजप

 

पुढील स्‍लाइडवा वाचा, काँग्रेसचे उत्तर : राहुलना रजिस्टर दिले नाही, ती सही त्यांची नाही...

बातम्या आणखी आहेत...