आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Narendra Modi Pti Interview Latest News

मोदींच्या क्लिन चीटवर राहुल गांधींचा हल्ला, \'अजून वरिष्ठ न्यायालयांचा निर्णय येणे बाकी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दंगलीसाठी नरेंद्र मोदींना क्लिन चीट देणा-या एसआयटी चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एसआयटीचा अहवाल सदोष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 'या प्रकरणावर अजून वरिष्ठ न्यायालयाचा निर्णय यायचा आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गुजरात दंगलीवरुन मोदींचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'एसआयटीच्या अहवालात नरेंद्र मोदींना क्लिन चीट दिल्यानंतर देशातील अनेक ज्येष्ठ आणि प्रसिद्ध विचारवंतानी प्रश्न उपस्थित केले होते.'
यावेळीही यूपीएचे सरकार - राहुल गांधी
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले, देशात पुन्हा एकदा यूपीएचे सरकार स्थापन होईल. काँग्रेसला कमी लेखून चालणार नाही. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत पक्षाला 2009 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल म्हणाले, यूपीए आघाडीबाबत काँग्रेसचे धोरण स्पष्ट आहे. समविचारी पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस काम करणार आहे. देशात यूपीए- 3 चेच सरकार सत्तेवर येणार आहे.

राहुल गांधींनी मान्य केले, एका मर्यादेपर्यंत सरकारविरोधी वातावरण
एका प्रश्नाच्या उत्तर राहुल गांधींनी मान्य केले की, एका मर्यादेपर्यंत केंद्र सरकारविरोधात वातावरण आहे. मात्र, त्यांनी विश्वास व्यक्त केला की जनता त्यांनाच समर्थन देणार. ओपिनियन पोल हस्यास्पद प्रकार असल्याचे ते म्हणाले. पण,यंदाची निवडणूक आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी मान्य केले.

लोकपालला घटनात्मक संस्थेचे अधिकार देण्याची इच्छा
राहुल गांधी यांनी पक्षात एकाधिकारशाही नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, माझ्या निर्णयांना अनेकदा बाजूला ठेवले जाते. त्याचे उदाहरण त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले, लोकपालला घटनात्मक संस्थेचा दर्जा देण्याचे मत मी मांडले होते. मात्र, सरकारने त्यास नकार दिला.
भाजपचा पलटवार
राहुल गांधी यांनी मुलाखतीत एसआयटी चौकशी बद्दल प्रश्न उपस्थित केल्यानतंर, भाजपने तत्काळ प्रतिक्रीय दिली आहे. भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या, राहुल गांधी यांनी एसआयटी चौकशीबद्दल बोलणे हा त्यांचा अजेंडा आहे. गुजरात दंगलीशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा नाही.