आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi New Add Targets On AAP Arvind Kejriwal

काँग्रेसच्या नव्या जाहिरातीतून केजरीवालांवर निशाणा, वादग्रस्त हसीबाला ठेवले बाजूला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राहुल गांधी यांना पुढे करुन निवडणूक प्रचाराला सुरवात करणा-या काँग्रेसच्या नव्या जाहिरातीत 'आप'वर निशाणा साधण्यात आला आहे. या जाहिरातीत 'अराजकात नाही, प्रशासनात सुधारणा' ही घोषणा देण्यात आली आहे. यात लोकपाल, लोकायुक्त आणि माहितीचा अधिकार (आरटीआय) काँग्रेसने आणल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीत युवक काँग्रेसच्या नेत्या हसीबा अमीन मात्र दिसत नाहीत.
काँग्रेसच्या नव्या जाहिरातीत 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख नाही. मात्र, त्यांनी नुकतेच दिल्ली पोलिसांच्या विरोधात रेल्वे भवन समोर धरणे आंदोलन केले होते. तेव्हा त्यांच्यावर अराजकता पसरवण्याचा आरोप झाला होता. त्याच्या उत्तरात केजरीवाल यांनी होय, मी अराजकतावादी असल्याचे म्हटले होते.
नरेंद्र मोदींना लक्ष्य करणा-या जाहिरातीत हसीबा अमीन मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. विरोधकांचे माझ्या विरोधातील हे षडयंत्र असल्याचे हसीबांनी स्पष्ट केले होते.
याआधी काँग्रेसने जारी केलेल्या पहिल्या जाहिरातीतवरुनही वाद झाला होता. या जाहिरातीत काँग्रेसने भाजपची पंच लाइन 'मी, नाही आम्ही' चोरल्याचा आरोप झाला होता. 2010 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमातील बॅनरवर ही घोषणा होती. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसने 'प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताचा विकास' या नव्या घोषणेचा जाहिरातीत वापर करण्यास सुरवात केली आहे.