आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् राहुल यांनी पत्र परत घेतले; बंगल्यासाठीचा सोमय्यांचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सभागृहात भाजप-काँग्रेस सदस्यांतून भलेही विस्तव जात नाही. मात्र, बाहेर या पक्षांची मंडळी परस्परांच्या मदतीला धावून जातात. दस्तुरखुद्द राहुल गांधी यांच्याबाबत घडलेला असाच एक किस्सा समोर आला आहे. या वेळी त्यांच्या मदतीला भाजपचे किरीट सोमय्या आले.
घडले असे की, राहुल यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना एका बड्या नेत्याच्या हस्ते पत्र पाठवून हुमायू रोडस्थित सी-1-7 हा बंगला मागितला होता. हा बंगला आपण बºयाच वर्षांपासून कार्यालय म्हणून वापरत असल्याचेही पत्रात नमूद होते. विशेष म्हणजे हा बंगला काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांच्या नावे देण्यात आलेला आहे. नियमानुसार पाहुण्यांच्या सोयीसाठी देण्यात आलेला बंगला कोणालाही आपल्या मतदारसंघाचे कार्यालय म्हणून वापरता येत नाही.
राहुल यांचे पत्र लोकसभा अध्यक्षांनी निवासस्थानांची व्यवस्था करणाºया संसदीय समितीकडे पाठवले. या समितीचे अध्यक्षपद किरीट सोमय्या यांच्याकडे आहे. हे पत्र पाहताच सोमय्या यांनी एका काँग्रेस नेत्याच्या हस्ते राहुलना निरोप पाठवला आणि कळवले की, ‘आजवर या बंगल्याचा ज्या प्रकारे वापर होत आहे तो मुळात चुकीचा आहे. हे पत्र परत घेतलेलेच चांगले! अन्यथा अडचणी वाढू शकतात.’ यावर राहुल यांनी 18 जुलैला दुसरे पत्र लिहिले. यात म्हटले की, ‘बंगल्याची मागणी करणारा माझा अर्ज मी परत घेऊ इच्छित आहे!’

राहुलकडे आणखी एक बंगला
विशेष म्हणजे, राहुल यांच्या नावे 12, तुघलक रोडवर पूर्वीपासूनच एक बंगला आहे. दुसरीकडे दिल्लीत लोकप्रतिनिधींना देण्यासाठी निवासस्थाने शिल्लक नाहीत.