आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress, Planning Commission

माझी नियत स्वच्छ आहे - राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टांडा(हिमाचल प्रदेश) - कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी माजी सैनिकांशी संवाद साधला. आपण माजी सैनिकांच्या मागण्या पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला. मात्र, ते ठोस आश्वासन देऊ शकले नाहीत. ते म्हणाले, मी मोठी आश्वासने देऊ शकत नाही. माझी नियत स्वच्छ आहे. मात्र, तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन, असा विश्वास मी देतो. केंद्रीय वेतन आयोगामध्ये सशस्त्र दलाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्याची मागणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, असे राहुल म्हणाले. भारतात निवडणूक म्हणजे वैचारिक युद्ध आहे. एकीकडे कॉँग्रेस आहे. सत्ता प्रत्येकाकडे असायला हवी असा त्यांचा विचार आहे. दुसरीकडे केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकच देश चालवू शकतात असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यांच्या दृष्टीने गरिबांसाठी कोणतेही स्थान नाही.


कॉँग्रेससाठी ओपनिंग करण्यास सचिन-सेहवागची तयारी नाही
कॉँग्रेस वाराणसीमधून सचिन तेंडुलकर आणि दिल्लीतून वीरेंद्र सेहवाग यांना तिकीट देऊ इच्छित होते. मात्र, टीम इंडियासाठी प्रदीर्घ काळ सुरुवात करणा-या स्फोटक फलंदाजांनी कॉँग्रेससाठी ओपनिंग करण्यास नकार दिला आहे.


सचिन तेंडुलकर । कॉँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी सचिनशी संपर्क साधून मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात येते. मात्र, सचिनने त्यास नकार दिला होता. भारतरत्न मिळाल्यानंतर कोण्या एका पक्षाचा शिक्का आपल्यावर बसावा अशी त्याची इच्छा नसल्याचे संकेत दिले आहेत.


वीरेंद्र सेहवाग । कॉँग्रेस वीरेंद्र सेहवागला दक्षिण किंवा पश्चिम दिल्लीमधून तिकीट देऊ इच्छित होते. मात्र, सध्या आपण क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्याने कॉँग्रेसला कळवले. सेहवागची बहीण अंजू मेहरवाल दक्षिणपुरी एक्सटेंशनच्या कॉँग्रेस नगरसेविका आहेत त्यामुळे कॉँग्रेसने सेहवागशी संपर्क साधल्याचे मानले जाते.


आरएसएसने राहुलवर पुन्हा निशाणा साधला
कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा चोरल्याचा आरोप त्यांच्यावर केला. पटेल यांनी संघाला देश नष्ट करणारे विष संबोधले होते याची आठवण त्यांनी करून दिली.


सोनिया गांधी श्रीमंत कशा : मनेका गांधी
भाजप नेत्या मनेका गांधी यांनी आपल्या जाऊ आणि कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आंतरराष्‍ट्रीय मीडियानुसार सोनिया गांधी जगातील सहाव्या श्रीमंत महिला आहेत. हुंड्यात एक पैसाही न आणलेल्या सोनिया एवढ्या श्रीमंत कशा, असा सवाल त्यांनी केला आहे.