आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा अनुभव नाही, तरी निर्णय घेण्याचे अधिकार : देवरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राहुल गांधी यांच्या सल्लागारांना वास्तवाचे भानच नव्हते. निवडणूक लढवण्याचा, जिंकण्याचा अनुभव नव्हता तरीही ते निर्णय घेत होते, अशा शब्दांत राहुल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी शरसंधान केले. बुधवारी एका मुलाखतीत हे मत मांडल्यावर वादंग होताच पक्षावरील निष्ठा व निवडणुकीतील पराभवाची खंत यातून ही प्रतिक्रिया उमटली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, सोनिया गांधी 24 रोजी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक घेणार आहेत.
अहवाल पाठवणार : माणिकराव
देवरा यांचे बोलणे धक्कादायक आहे. मला आश्चर्यच वाटले. त्यांच्या वक्तव्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
देवरांच्या म्हणण्यात तथ्य : देवरांचे बोलणे पूर्णपणे खरे नसले तरी त्यात तथ्य आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. प्रिया दत्त यांनीही नेते जनतेपासून दूर गेल्यानेच पराभव झाल्याचे म्हटले आहे.