आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये मुलभूत बदलांची गरज -युपीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी स्विकारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये मुलभूत बदल होण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी मान्य केले की यूपीमध्ये काँग्रेस कमजोर होती. भाजपने गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 
 
भाजपसोबत वैचारिक लढाई 
- राहुल गांधी म्हणाले, आम्ही सध्या विरोधीपक्षात आहोत. चढ-उतार येत असतात. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कमजोर होतो, येत्या काळात त्यात सुधारणा होईल अशी आशा आहे. 
- गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापन करत असल्यावर राहुल म्हणाले, 'भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. सत्तेसाठी पैशांचा वापर करत आहे.'
- भाजपसोबत आमची वैचारिक लढाई आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये आम्ही विजयी झालो. तेथे आम्हाला यश मिळाले आहे. संघटनेत मुलभूत बदल करण्याची गरज आहे. 
 
उत्तर प्रदेश विजयासाठी भाजपचे अभिनंदन 
- राहुल गांधी म्हणाले, 'उत्तर प्रदेशात भाजप विजयी झाली आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक ध्रुवीकरण होत आहे.'
- पाच राज्यांच्या निवडणुकीपैकी दोन ते जिंकले तीन आम्ही. त्यापैकी दोनमध्ये आर्थिक रसद पुरवून पैशांचा गैरवापर करुन भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.
 
सत्तेसाठी भाजपची हाव लोकशाहीसाठी धोका - वढेरा 
- सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी भाजपची सत्ताकांक्षा लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. 
- गोवा विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून सुरु असलेल्या सर्व प्रयत्नांवर रॉबर्ट यांनी फेसबुकवर कॉमेंट केली आहे. 
- त्यांनी लिहिले, की गोव्याच्या जनतेने दिलेला कौल नाकारत भाजपने सरकार स्थापनेसाठी जे प्रयत्न चालवले आहे, ते घटनाविरोधी आहे. 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...