आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Slapped Congress Nationalist Government Over The Adarsh Scam

काँग्रेस-राष्‍ट्रवादी सरकारला राहुलचा ‘आदर्श’ फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आदर्श घोटाळ्याचे भूत पुन्हा एकदा राज्य सरकारच्या मानगुटीवर बसणार आहे. खुद्द राहुल गांधी यांनीच आदर्श सोसायटी घोटाळ्याचा चौकशी अहवाल फेटाळण्याचा राज्य सरकारचा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. शिवाय निर्णयावर फेरविचार करण्याची सूचनाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी केली.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खंगलेल्या काँग्रेसला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी राहुल यांनी केलेल्या या सूचनेचा तत्काळ परिणामही जाणवला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना थांबवून यावर खुलासा केला. मात्र, दिल्लीतील या घडामोडींमुळे राज्य काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्‍ट्रवादी काँग्रेसनेही यातून अंग काढून घेत चौकशी अहवाल फेटाळल्याचे खापर अगोदरच मुख्यमंत्र्यांवर फोडले आहे. आता राहुल यांच्या वक्तव्याने आदर्श प्रकरण पुन्हा तापले आहे.
काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर राहुल यांनी आक्रमक भूमिका घेतली.
राहुल म्हणाले...
० लोकपाल कायदा करून भ्रष्टाचार मिटणार नाही. यासाठी जागोजाग तशी रचना उभी करावी लागेल.
० आम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध खूप काही करावयाचे आहे. परंतु, संसदेत आम्ही अडकलो आहोत. अनेक विधेयके प्रलंबित आहेत. विरोधी पक्ष यावर मौन बाळगून असल्याने अडचण आहे.
० भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची भाषा आपण नेहमी ऐकतो. आता असे बोलण्याची फॅशनच झाली आहे. (नरेंद्र मोदींवर अपरोक्ष टीका)
मिलिंद देवरांच्या ट्विटची जादू!
कलंकित नेत्यांना अभय देणारा अध्यादेश केंद्र सरकारने काढला तेव्हा केंद्र सरकारमधील तरुण मंत्री मिलिंद देवरा यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. हाच प्रकार आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल राज्य सरकारने फेटाळल्यानंतर घडला. या मुद्द्यावर देवरा यांनीच ट्विट केले होते. नेमक्या दोन्ही वेळी राहुल गांधी यांनी गांभीर्याने दखल घेतली, हे उल्लेखनीय होय.
सहका-यांशी चर्चा करून निर्णय घेऊ
राहुल यांची पत्रकार परिषद संपताच मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना थांबवत स्वत:हून यावर खुलासा केला. मंत्रिमंडळातील सहका-यांशी चर्चा करून सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
जबाबदार कोण ते शोधा : मलिक
चौकशी अहवाल फेटाळण्यास भाग पाडणा-या नेत्यांचा काँग्रेसने शोध घ्यावा, असे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांसह सनदी अधिका-यांवर ताशेरे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांसह बड्या सनदी अधिका-यांवरही चौकशी अहवालात ताशेरे ओढलेले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, काय आहे आदर्शच्या अहवालात