आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट न्यूट्रॅलिटी: \'युवकांचा अधिकार हिसकावून सरकार उद्योगपतींना वाटत आहे\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भू-संपादन विधेयक, अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरुन सरकारला कोंडीत पकडणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नेट न्यूट्रॅलिटीवरुन लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, 'मनरेगा, अन्न सुरक्षा याप्रमाणेच युवकांसाठी इंटरनेट हा त्यांच्या अधिकार आहे. केंद्र सरकार बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी त्यांच्या हातात नेटचा अधिकार देण्याचा प्रयत्न करीत आहे. एक अब्ज लोकांनी याविरोधात आपला रोष नोंदवला आहे. सरकारने नेटची निरपेक्षता आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवलेच पाहिजे.' सोमवारी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी भू-संपादनाचे जाचक विधेयक, शेतमालाचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वरुन विरोध केला होता.
ओबामांकडून मोदींच्या प्रशंसेवरुन सरकारला काढला चिमटा
नेट न्यूट्रिलीटीवर सभागृहात बोलताना राहुल गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी टाइम मॅगझीनमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल गौरोद्गार काढल्याचे सांगत सरकारला चिमटा काढला. भाजप खासदारांकडे निर्देश करत ते म्हणाले, 'आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या पंतप्रधांनाबद्दल आहे. काल मी टाइम मॅगझीनमध्ये बराक ओबामांकडून मोदींची प्रशंसा केल्याचे वाचले. अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षांनी गार्बोचेव्ह नंतर कोणाची स्तुती केल्याचे ऐकिवात नाही. अमेरिकेत सर्वाधिक उद्योग आहेत त्यांनी गेल्या 60 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानाचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ आहे.' राहुल गांधींच्या 'तुमचे पंतप्रधान' या शब्दाला भाजप खासदारांनी विरोध केला.
दुरसंचार मंत्री म्हणाले, नेट न्यूट्रिलीटीबद्दल सरकार गंभीर
राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना दुरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले, 'सरकार या मुद्यावर गंभीर आहे. यात कोणत्याही कॉर्पोरेटला फायदा मिळवून देण्यासाठी निर्णय होणार नाही. जनतेला नेट वापरताना कुठल्याही भेदभावाचा सामना करावा लागणार नाही.'
नेट न्यूट्रालिटीवर स्थगन प्रस्ताव आणला पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. याबाबत चर्चेसाठी त्यांनी लोकसभा सभापतींना रितसर नोटीसही दिली होती. इंटरनेटच्या वापरामध्ये काही कंपन्यांना सेवा पुरवठादारांकडून झुकते माप दिले जाते. त्यामुळे अशाच कंपन्यांच्या साईट सहज आणि वेगाने उघडल्या जाणार. इतर साईट सर्फिंगसाठी वेळ लागण्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इंटरनेट युजर्स काही विशिष्ट साइटकडेच जातील. हे मुद्दाम एखाद्याच्या फायद्यासाठी केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर नेट न्यूट्रालिटीची मोहीमच या क्षेत्रातील जाणकारांनी हाती घेतली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे नेट न्युट्रॅलिटी