आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी देशभर करणार पदयात्रा, शेतकऱ्यांसाठी रोज १५ ते १८ किमी प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ‘किसान पदयात्रा’ सुरू करणार आहेत. या यात्रेचे नियोजन पूर्ण झाले असून संसदेचे अधिवेशन संपताच याची आैपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. रामलीला मैदानावरील शेतकरी मेळाव्यादरम्यान त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. यासाठी राहुल यांनी दूरगामी रणनीती तयार केली आहे.
या अंतर्गत ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्राच्या विदर्भातून त्यांची पदयात्रा सुरू होणार आहे. तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या मार्गाने ते देशभरात पदयात्रा करणार आहेत. ते दररोज १५ ते १८ किलोमीटर पदयात्रा करतील.

ज्या प्रदेशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे त्या प्रदेशांना प्राथमिकता देण्यात येईल. भूमी अधिग्रहण, शेतमालाच्या न्याय्य भावाचे प्रश्न याविषयी देशभरात खदखद आहे. या पदयात्रेसंबंधी पार्टीच्या बड्या नेत्यांनी सध्या मौन पाळले आहे.