आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Posts A Picture Of Himself Attending A Tech Conference In Aspen

राहुल गांधी देखील USAमध्ये, कॉन्फरन्समध्ये असल्याची माहिती, ट्विट केला फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्याचे सर्वांना माहिती आहे पण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देखील अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपासून चर्चा चालू आहे की राहुल गांधी सुट्टीवर गेले आहेत. या चर्चेच्या दरम्यान, सोमवारी सकाळी राहुल गांधींच्या कार्यालयाने एक ट्विट करुन ते एस्पेनमध्ये असल्याची माहिती दिली आहे. त्यासोबतच एक फोटो देखील प्रसिद्ध केला आहे ज्यात राहुल गांधी एका कार्यक्रमात असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसने ट्विट करुन राहुल यांच्याबद्दल दिलेली माहिती देशाची दिशाभूल करणारी असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी केला आहे. ते म्हणाले, 'राहुल गांधी ज्या कॉन्फरन्ससाठी गेल्याचे सांगितले जात आहे ती जून-जुलैमध्येच पार पडली आहे.' कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते मिलिंद देवरा देखील दिसत आहेत.
ट्विटमध्ये काय आहे
@OfficeOfRG
Very interesting discussions on the global economy &the disruptive power of tech at the conference in Aspen
वाद का
राहुल गांधी गेल्या आठवड्यात अमेरिकेसाठी रवाना झाले होते. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते, 'राहुल गांधी एस्पेनला एका कॉन्फरन्ससाठी गेले आहेत.' मात्र त्यांनी या परिषदेची तारीख आणि राहुल गांधींचा अमेरिकेत किती दिवस मुक्काम असेल हे सांगितलेले नाही. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले होते, बिहारमध्ये काँग्रेस पराभवाच्या छायेत आहे त्यामुळे नितीशकुमार आणि लालू यादवांनी त्यांना सुटीवर पाठविले आहे.