आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Press Meet On Salman Khurshid Comment

अशी भाषा चालणार नाही, खुर्शीद यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांची नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्या नरेंद्र मोदींविरोधातील वाचाळ वक्तव्यावर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. मोदींविरोधात सलमान खुर्शीद यांनी ही भाषा वापरायला नको होती, असे राहुल यांनी आज (गुरुवारी) माध्यमांशी बोलाताना सांगितले.

सलमान खुर्शीद यांनी मोदींवर टीका करताना ते नपुंसक असल्याचे म्हटले होते. गुजरातमध्ये 2002 मध्ये उद्‍भवलेल्या दंगली रोखण्यात मोदी असमर्थ ठरले होते. हे सांगण्यासाठी खुर्शीद यांनी मोदी हे 'नपुंसक' असल्याची भाषा केली होती.

खुर्शीद यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसवर टीकेची झोड उठली होती. केवळ भाजपच नाही तर अन्य पक्षांनीही खुर्शीद यांच्या या वक्तव्यावरुन कॉंग्रेसवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर राहुल यांनी स्वत: सलमान खु्र्शीद यांच्या वाचाळ वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली असून त्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.

दरम्यान, खुर्शीद यांच्या नरेंद्र मोदींवरील टिप्पणीवरून भाजप संतप्त झाली आहे. काँग्रेसला पराभव डोळ्यांसमोर दिसत असून त्यामुळे त्यांचा तोल जात असल्याचे भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

खुर्शीद यांची टिप्पणी नैतिकतेला धरून नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. खुर्शीद यांच्या वक्तव्याची आम्ही निंदा करतो. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, भाजपची ही मागणी खुर्शीद यांनी फेटाळली आहे.