आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांच्या वस्तीत पोहोचले काँग्रेसचे युवराज, ट्रकमधून गल्ल्यांमध्ये फिरले, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गप्पा आणि स्वतःच्या प्रचारामध्ये गुंग असतात अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी कालकाजी येथे केली. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांनी रोड शो केला. त्यावेळी मोदींवर हल्ला चढवत त्यांनी मोदीराजमध्ये केवळ तीन-चार उद्योगपतींबरोबरच काम होत असल्याचे सांगितले.
मोदी केवळ गप्पा करतात काम कधी करतील. केंद्रात मे मध्ये भाजपचे सरकार तयार झाल्यानंतर मोदी केवळ स्वतःचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. एनडीए सरकार केवळ त्यांच्या बाजुने असलेल्या लोकांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल गांधींच्या रोड शोसाठी चांगलीच गर्दी झाली होती. राहुल ज्या ट्रकवर बसलेले होते, त्याच्या आसपास लोक जमा झाले आणि त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत होते.

राहुल गांधींनी रोड शो मध्ये काँग्रेस सरकारच्या यशाचे गुणगान केले. राहुल गांधी म्हणाले, आम्ही लोकांना माहितीचा अधिकार दिला, मनरेगांतर्गत रोजगाराची हमी दिली. काँग्रेस गरीब आणि कमकुवत लोकांचा पक्ष आहे. आम्ही सर्व स्तरातील लोकांचे हित लक्षात घेतो. काँग्रेस हा एकच अशा पक्ष आहे जो गरजू लोकांबरोबर नेहमी उभा असतो. ज्याप्रमाणे आम्ही देशाला शिक्षणाचा अधिकार दिला त्याचप्रमाणे आम्ही घराचा अधिकारही देऊ.

राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीमध्ये स्वस्त वीज, पाणी आणि सर्वांसाठी घर यासह रोजंदारीवर कामाऐवजी पक्की नोकरी मिळणे गरजेचे आहे. दिल्ली विधानसभेत यावेळी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यास आम्ही या सर्व मुद्यांवर काम करू. गरिबांना घरे देऊ. दिल्लाचा विकास केवळ काँग्रेस पक्ष करू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लव्हली म्हणाले की, काही पक्ष खोटी आश्वासने देऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे राहुल गांधी म्हणाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोड शोचे PHOTO