आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आणि \'आप\'च्या भांडणात दिल्लीची होरपळ, राहुल गांधीचे टिकास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छता कर्मचार्‍यांशी चर्चा करताना राहुल गांधी - Divya Marathi
स्वच्छता कर्मचार्‍यांशी चर्चा करताना राहुल गांधी
नवी दिल्ली- कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका दगडात दोन पक्षांची शिकार केली आहे. राहुल गांधी यांनी भाजपसह आम आदमी पक्षावर (आप) घणाघात टिका केली आहे. भाजप आणि 'आप'च्या भांडणात दिल्लीकर होरपळत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पूर्व दिल्लीतील स्वच्छता कर्मचार्‍यांची गुरुवारी भेट घेतली. स्वच्छता कर्मचार्‍यांचे म्हणणे जाणून घेतते.

स्वच्छता कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने ते 'आप' सरकारच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत. राहुल यांनी स्वच्छता कर्मचार्‍यांसोबत तब्बल एक तास चर्चा केली.

'तुम्ही स्वच्छता कर्मचारी नसून शिपाई आहेत. एकत्र व्हा, सरकारला आपली ताकद दाखवा. पाच मिनिटांतच सरकार तुमच्या पुढे लोटांगण घालत येईल', अशा शब्दात राहुल गांधी यांनी उपोषणाला बसलेल्या स्वच्छता कर्मचार्‍यांना सल्ला दिला. राहुल यांनी यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारही टीका करण्‍याची एकही संधी सोडली नाही.

दिल्लीत 'आप' तर केंद्रात भाजपचे सरकार आहे. दोन्ही सरकार एकमेकांवर खापर फोडत आहे. या दोघांच्या भांडणात मात्र, दिल्लीतील जनतेची होरपळ होत आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन सरकारला आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. ताकद दाखवल्याशिवाय सरकार लक्ष देणार नाही, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, दिल्ली सरकारने 15 जूनच्या आत पूर्व दिल्लीतील सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना पगार द्यावा, असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण
पूर्व दिल्लीतील स्वच्छता कर्मचार्‍यांचे वेळेवर पगार होत नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचार्‍यांनी काही दिवसांपासून सरकारविरुद्ध धरणे आंदोलन सुरु केले आहे. कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारल्यामुळे पूर्व दिल्लीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांनी उपोषण न थांबवल्यास रस्त्यांवरून चालणे अवघड होणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका...
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 'ट्‍वीट' करून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 'दिल्लीतील कचरा काय आता केजरीवाल उचलतील', असे सिसोदीया ट्‍वीटद्वारे म्हटले आहे.

अधिकार्‍यांची नियुक्ती आणि बदलीचे अधिकार तर केंद्र सरकारने आपल्याकडे राखून ठेवले आहे. उपराज्यपाल दिवसभरात किमात दहा वेळा सांगतात की, दिल्लीत कोणाची नियुक्ती आणि बदली करायचे काम आमचे आहे. परंतु, आता दिल्लीतील कचरा कोणी उचलावा, याबाबत ते गप्प का? असा सवाल सिसोदियांनी केला आहे.
अधिकारी काम करणार नाही तर कारवाई केंद्र सरकार करेल आणि कर्मचार्‍यांच्या पगाराची व्यवस्था केजरीवालांनी करावी काय? असा खोचक सवाल सिसोदियांनी केला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...