आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Said To Partymen, He Can\'t Be Blamed For All Things Happened In The Past

INSIDE STORY:काँग्रेसच्या ज्येष्ठांना राहुलने सुनावले, इतिहासातील सर्वच घटनांना जबाबदार नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या मुलाखतीनंतर काँग्रेस अजूनही नफ्या-तोट्याचा हिशेब करीत आहे. त्याचबरोबर पुढील रणनिती तयार करण्याचेही काम सुरु आहे. मात्र, सुत्रांची माहिती आहे, की 1984 च्या दंगलीच्या मुद्यावरून वादाच्या भोव-यात सापडलेल्या राहुल गांधी यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना म्हटले आहे, की इतिहासात झालेल्या सर्वच घटनांना मला जबाबदार धरता येणार नाही.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी 1984च्या शीखविरोधी दंगलीबद्दल केलेल्या वक्तव्याने राहुल यांनी भाजपला 2002च्या दंगलीची तुलना 84 च्या दंगलींशी करण्याची ऐती संधी दिली आहे. मुलाखती दरम्यान 84च्या दंगलीत काही काँग्रेस नेते असल्याची राहुल यांनी जाहीर कबूली दिली होती. त्यांच्या याच विधानांचा विरोधक फायदा उचलत आहेत.
राहुल गांधी यांची ही मुलाखत कशी झाली, का दिली गेली मुलाखत. त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि मुलाखतीला चांगला प्रतिसाद का मिळाला नाही. आता यापुढील रणनिती काय असेल, या प्रश्नांची उत्तरे शोधणे ही महत्त्वाचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये, मुलाखतीसाठी कोण जबाबादार होते, का दिली गेली मुलाखत...