आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Seeks One Week\'s Time To Reply To Election Commission\'s Notice

निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी राहुल गांधींना हवा एक आठवडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एक आठवड्याची मुदत मागितली असताना निवडणूक आयोगाने त्यांना चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबर पर्यंत काँग्रेस उपाध्यक्षांना त्यांची बाजू मांडावी लागणार आहे. राहुल गांधी यांनी जाहीर सभेत मुजफ्फरनगर दंगल पीडित तरुणांच्या संपर्कात 'आयएसआय' असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजप द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या द्वेषातून दंगली भडकत असल्याचेही ते म्हणाले होते. यावर आक्षेप घेत भाजपने राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
यासंबंधात निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून उत्तर देण्याची आज (सोमवार) शेवटची तारीख होती. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी त्यांनी एक आठवड्याची मुदत मागितली होती.

पुढील स्लाइडमध्ये.. काय आहे भाजपचा आक्षेप आणि काय म्हणाले होते राहुल गांधी