आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुलच्या मोदींवरील भाष्यावरून वादंग, भाजपने केली माफीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या एका वाहिनीवरील मुलाखतीवरून सध्या वादंग माजले आहे. गुजरात दंगलीस नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार जबाबदार असल्याचे राहुल यांनी म्हटले होते. यावर राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. काँग्रेसने मात्र राहुलचा बचाव केला. गुजरात दंगल मोदी सरकारनेच पेटवल्याचा आरोप पक्षाने केला.
भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांचे हे अज्ञान असल्याचे सांगून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. यावर काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी 1984ची दंगल उत्स्फूर्त होती, असा दावा करून 2002 मधील गुजरात दंगल मुद्दाम पेटवलेली होती, असा आरोप भाजपवर केला.
त्यांना अटक करा : सुखबीर
राहुल गांधींनी शीखविरोधी दंगलीत ज्या काँग्रेस नेत्यांचा हात असल्याची जाहीर कबुली दिली, त्या नेत्यांना केंद्र सरकारने अटक करावी, अशी मागणी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. ते म्हणाले, या वक्तव्याबद्दल राहुल यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे.