आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Speeches Politics Congress Latest News

राहुलबाबत रमेश यांच्‍या वक्तव्‍यावरुन कॉंग्रेसने झटकले हात, भाजपने उडविली खिल्‍ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- मुझफ्फरनगर येथील जातील दंगलीनंतर वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करणारे कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांनी मुस्लिम समुदायाची माफी मागितली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्‍यक्‍त केले होते. कॉंग्रेसने रमेश यांच्‍या वक्‍तव्‍याबाबत हात वर केले असून ते त्‍यांचे वैयक्तिक मत असू शकते असे म्‍हटले. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे यासंबंधी स्‍पष्‍टीकरण दिले असल्‍याचेही कॉंग्रेसने म्‍हटले आहे. दुसरीकडे भाजपने जयराम रमेश यांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवली. आपल्‍या वक्‍तव्‍यासंबंधी राहुल गांधी मुसलमानांची माफी मागणार की जयराम रमेश राहुल गांधीची मागणार हे पाहावे लागेल, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दिल्‍लीच्‍या इस्‍लामिक सांस्‍कृतिक केंद्रात उर्दू माध्‍यमातील पत्रकारांशी बोलताना रमेश म्‍हणाले, एखाद्या समाजाची छबी बिघडवण्‍याची त्‍यांची (राहुल गांधी) इच्‍छा नव्‍हती. माध्‍यमातील एका गटाने आणि विरोधी पक्षांनी तिखट-मीट लावून त्‍याला प्रसिद्धी दिली. ते खरे तर धर्मनिरपेक्ष आहेत. याप्रकरणी त्‍यांच्‍यावर कोणी शंका घेऊ शकत नाही.

राहुल गांधींच्‍या वादग्रस्‍त विधानामुळे अल्‍पसंख्‍यांक लोकांमध्‍ये रोष असल्‍याचे पत्रकारांनी रमेश यांच्‍या निदर्शनास आणून दिले. यावर त्‍यांनी राहुल यांनीच याप्रकरणी स्‍पष्‍टीकरण दिले पाहिजे, असे म्‍हटले. देश धर्मनिरपेक्षांच्‍या हातात सुरक्षित आहे. कॉंग्रेस पक्ष भारताचे धर्मनिरपेक्ष स्‍वरूप कायम ठेवण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहे. देशाच्‍या या स्‍वरूपाचे कॉंग्रेस पक्ष भविष्‍यातही सदैव रक्षण करेल. पुढच्‍या स्‍लाईडमध्‍ये वाचा राहुल म्‍हणाले- भाजप म्हणजे चोरांचा पक्ष