आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल सक्रिय, शेतक-यांशी संवाद; आज भूसंपादनविरोधी मेळाव्याला मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी वारी शेतक-यांशी संवाद साधला. शेतक-यांच्या अनेक शिष्टमंडळांसोबत ते चर्चा करताना दिसून आले. दोन महिन्यांच्या सुटीनंतर शुक्रवारी मायदेशी दाखल झाल्याच्या दुस-याच दिवशी ते पुन्हा कामावर परतले.
फोटो - दिल्लीत काँग्रेसच्या भूसंपादन बिलासंद्भातील मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे.

अवेळी आलेला पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीचे किती नुकसान झाले आहे, याची माहिती शेतक-यांनी राहुल यांना दिली. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडून मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचेही सांगितले. शेतक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नसल्याबद्दल राहुल यांच्यासमोर कैफियती मांडण्यात आल्या. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातील शेतक-यांनी थेट भेटी घेतल्या. भट्टा परसौल गावातील शेतकरीही त्यात सहभागी होते. २०११ मध्ये बळजबरीने भूसंपादन करण्याच्या कृतीच्या विरोधात राहुल यांनी पदयात्रा काढली होती. रविवारी काँग्रेसचा शेतकरी मेळावा आहे. हा मेळावा केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आहे. काँग्रेस नेते शकील अहमद यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. शेतक-यांचा हा संघर्ष एक -दोन दिवसांचा नाही. सरकार शेतक-यांच्या समस्या सोडवत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शेतक-यांसंबंधी मोदी सरकारच्या धोरणाला मोडीत काढू, असा इशारा काँग्रेस नेेते किरण चौधरी यांनी दिला आहे.

सोमवारच्या अधिवेशनातही मुद्दा
राहुल गांधी शेतक-यांच्या समस्या आणि भूसंपादन विधेयकाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्याची शक्यता आहे. सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू होणार आहे. काँग्रेस हा मुद्दा दोन्ही सभागृहांत उपस्थित करणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मेळाव्याच्या तयारीचे काही PHOTO