आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा, \'सरकार शेतकऱ्यांचे नाही तर उद्योगपतींचे\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 56 दिवसांच्या सुटीनंतर मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज (रविवार) केंद्र सरकार विरोधात मोर्चा उघडला. मोदींनी निवडणूकीत विजयी होण्यासाठी उद्योगपतींकडून कर्ज घेतले आणि त्याची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी स्वस्तात उद्योगपतींना देण्याचा घाट भू-संपादन विधेयकाच्या माध्यमातून घातल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राजधानीतील रामलीला मैदानावर आयोजित सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेस सरकराने स्वस्त कर्ज देऊन शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. 70 हजार कोटींची कर्ज माफी दिली. शेतकऱ्यांना मोठी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेले मोदी सरकार आता त्यांच्याच जमीनी स्वस्तात हडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या जमीनी त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करणार आहे. त्यासाठी त्यांनी उपस्थितांना ऑस्ट्रेलियातील हिरा खाणींचे उदाहरण दिले.
राहुल गांधी म्हणाले, 'आम्हाला असा भारत नाही पाहिजे, की फक्त काहीच लोकांकडे सेवा-सुविधा असतील आणि बाकीचे बेरोजगार आणि निवडणूकीत विजयी झालेल्यांच्या मागे पुढे फिरतील.'
राहुल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- उद्योगपतींआधी शेतकऱ्यांनी या देशाचा पाया मजबूत केला.
- काँग्रेस सरकराने स्वस्त कर्ज देऊन शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.
- मोदींना देशातील जनतेची आणि शेतकऱ्यांची ताकद लक्षात आली नाही.
- भाजपने निवडणूकीसाठी उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात पैसा घेतला आहे. त्याची परतफेड ते सत्ते आल्यानंतर आता उद्योगपतींना शेतकऱ्यांची जमीन स्वस्तात देऊन करत आहेत.
- भारताचा पाया हा शेतीवर अवलंबून आहे. तो पायाच कमकुवत करण्यासाठी मोदी भू-संपादनाचा घाव घालत आहेत.
- शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रुपये कर्ज माफ केले.
- आदिवासींच्या जमीनी उद्योगपतींच्या घशात जाणार नाही याची काळजी घेतली.
- सरकारने गरीबांसाठी काम केले पाहिजे मात्र मोदी सरकार परदेशात जाऊन सांगतात मी पन्नास वर्षांपासूनची घाण साफ करत आहे.

सोनिया गांधीच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- गेल्या अनेक दशकांमध्ये तुम्ही तुमचे रक्त आटवून भारताला ताठ मानने जगात चालण्याचे बळ दिल आहे.
- आता खूप झाले.. शेतकरी आणि शेतमजूरांच्या हिता विरोधात आता मोदी सरकारला काम करु देणार नाही.
- अवकाळी पाऊस, गारपिट यांने शेतकरी पोळला आहे.
- मोदी सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.

मोदींनी शेतकऱ्यांना फक्त स्वप्न दाखवली - डॉ. मनमोहनसिंग
काँग्रेसच्या भू-संपादन अधिग्रहण विधेयकविरोधी सभेला संबोधित करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांना फक्त स्वप्न दाखवली आहे. डॉ. सिंग यांनी आरोप केला, की मोदी सरकार जे भू-संपादन विधेयक घेऊन आले आहे ते 2013 मध्ये यूपीए सरकारने आणलेल्या अध्येदेशाला कमकुवत करणारे आहे. ते म्हणाले, 'शेतकऱ्याचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. आमच्या अध्यादेशात शेतकऱ्याचे हीत पाहिले गेले होते.' सोनिया गांधी आणि राहुल गांधी शेतकऱ्यांचे लढाईचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.