आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi To Select His Team, Interviews 200 Candidates

आपली टीम तयार करत आहे राहुल गांधी, सुटीवर जाण्याआधी घेतल्या 200 जणांच्या मुलाखती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी - Divya Marathi
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी
नवी दिल्ली - राहुल गांधींनी त्यांची टीम तयार करण्यासाठी नवीन वर्षाचा मुहूर्त निवडला आहे. नवीन वर्षाच्या सुटीवर जाण्याआधी त्यांनी 200 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यातील बहुतेक उमेदवार हे काँग्रेस कमकुवत असलेल्या राज्यातील आहेत. सोनिया गांधी देखिल आता नेत्यांना राहुल गांधींसोबत चर्चा करण्यासाठी पाठवत आहेत.

स्वतः लिहून द्या पक्षासाठी काय केले
- राहुल गांधींनी राज्यांमध्ये पुन्हा संघटन बांधणीसाठी तरुण नेतृत्वाच्या मुलाखती घेणे सुरु केले आहे. उमेदवारांकडून पक्षासाठी काय केले आणि राज्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, तुम्ही कोणत्या उपाय योजना सुचवाल, यावर दोन पानांचा निबंध लिहून मागवला जात आहे.
- उमेदवारांनी पक्षासाठी काय केले, किती आंदोलने केली, पदयात्रा केल्या, याचीही माहिती विचारली जात आहे.
- अशीही माहिती आहे, की ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यातील अधिक नावे त्या नेत्यांनी सजेस्ट केली आहेत जे राहुल गांधी पक्षाध्यक्ष होण्याच्या विरोधातील आहेत.
- सूत्रांचे म्हणणे आहे, की अनेक राज्यांमध्ये नेतृत्व बदल होण्याची शक्यता आहे. राज्यांच्या कार्यकारिणीसोबतही राहुल गांधी चर्चा करत आहेत.
- छत्तीसगड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि राजस्थान येथील प्रदेश कमिटीने राहुल यांना अहवाल दिला आहे.

सोनियांनी दिली राहुल गांधींना जबाबदारी
- सोनिया गांधी हळुहळु राहुल यांना जबाबदारी देत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया दिवसभरात तीनपेक्षा जास्त नेत्यांना भेटत नाहीत.
- दोन नेत्यांना सकाळी आणि एकाला लंच नंतर वेळ दिलेला असतो. यावर सूत्रांचे म्हणणे आहे, की त्यांची प्रकृती याचे कारण आहे.
- सोनिया गांधी काँग्रेसन नेत्यांना सांगत असतात की त्यांनी राहुल यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांच्या संपर्कात राहावे. जेणे करुन त्यांना पक्षातील घडामोडींची अधिक माहिती राहिल.