आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Travels In General Bogie Toward's Punjab

राहुल गांधी जनरल बोगीतून सुरक्षेविनाच पंजाबला रवाना, मुलींना दिले ऑटोग्राफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी मुलींच्या हातावरच ऑटोग्राफ दिले. - Divya Marathi
राहुल गांधींनी मुलींच्या हातावरच ऑटोग्राफ दिले.
नवी दिल्ली - शेतक-यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी पंजाबला रवाना झाले. पण नेहमीप्रमाणे लवाजम्यासह नव्हे तर यावेळी राहुल गांधी कोणतीही सुरक्षा न घेता रेल्वेच्या जनरल डब्यातून पंजाबकडे निघाले आहेत. नवी दिल्ली स्टेशनवर राहुल गांधींना रेल्वेत बसलेले वाहून सगळेच आवाक झाले. यावेळी ते डब्यात खिडकीच्या बाजुच्या सीटवर बसले. त्यांनी मुलींना ऑटोग्राफही दिले. या प्रवासात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया हेही राहुलबरोबर होते.

पंजाबमध्ये शेतकऱ्यांना भेटणार
रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले की, शेकऱ्यांकडून जमीन हिरावून घेतली जात आहे. त्यामुळे त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांची भेट घ्यायची आहे. या दौऱ्यात राहुल गांधी पंजाबच्या गोविंदगज आणि खन्ना येथील धान्य बाजारातील शेतकऱ्यांची भेटही घेतील. सुट्यांहून परतल्यानंतर राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचे मुद्ये लावून धरले आहेत.

पद यात्राही काढणार
राहुल गांधी ‘किसान पदयात्रा’ही सुरू करणार आहेत. यात्रेचा आराखडा जवळपास तयार झाला आहे. संसदेचे अधिवेशन संपण्यापूर्वीच या यात्रेची औपचारिक घोषणा केली जाईल. रामलीला मैदानाच्या किसान रॅलीमध्ये मोदी सरकारवर हल्लाबोल केलेल्या राहुल गांधी यांनी यासाठी खास रणनीती आखली आहे. त्यानुसार ते शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे हाती घेऊन पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

रोज 15-18 किमीचा प्रवास करणार
राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्राच्या विदर्भातून सुरू होईल आणि तेलंगणा, उत्तरप्रदेश, राजस्थानमार्गे देशातील इतर भागांत पोहोचेल. त्यात ते रोज 15 ते 18 किमीचा प्रवास करतील. शेतकरी आत्महत्या, भू संपादन अशा विविध मुद्यांवरून शेतक-यांमध्ये असंतोष असेल अशा राज्यांत ते आधी जातील. या पदयात्रेवर पक्षाचे मोठे नेते सध्या मौन बाळगून आहेत.

हे असतील राहुल गांधींचे मुद्दे
वादग्रस्त भू संपादन कायद्यापासून ते शेतक-यांच्या मालाला चांगाल दर मिळवून देणे असे प्रमुख मुद्दे राहुल गांधी उचलून धरणार आहेत. तसेच शेतकरी आत्महत्या आणि आदिवासांना त्यांचा हक्क मिळवून देणे या मुद्यांचाही समावेश असेल.