आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाविरुद्ध वक्तव्य; मानहानीचा खटला राहुल गांधी लढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महात्मागांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेाकांचा हात होता, या वक्तव्यावर आजही आपण कायम असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यावरून महाराष्ट्रात भिवंडी येथील न्यायालयात दाखल असलेला मानहानीचा खटला लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

मानहानीचा हा खटला रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर राहुल यांनी आपले हे अपील मागे घेतले. या खटल्यात वैयक्तिक उपस्थित राहण्याविषयी सूट देण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याने राहुल यांना आता भिवंडी न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे.

२४ ऑगस्ट रोजी राहुल यांच्या वतीने बाजू मांडताना अॅड. कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की, राहुल यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येत संघटना म्हणूनकधीही संघाला जबाबदार ठरवले नव्हते. संघाशी संबंधित लोकांचा फक्त त्यांनी उल्लेख केला होता. राहुल यांनी हा यू-टर्न घेतल्यानंतर वाद वाढत गेला आणि गुरुवारी अखेर राहुल यांनी खटल्याला सामोरे जाण्याचे ठरवले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण म्हणाले राहुल यांना विसराळूपणाचा राेग...
बातम्या आणखी आहेत...