आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहन सिंग म्हणाले, राहुल काँग्रेसचे लाडके; तर हा पक्ष देशावरील ओझे असल्याची BJPची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राहुल गांधी काँग्रेसने नवे अध्यक्ष असणार आहेत. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांच्या बिनविरोध निवडीची दाट शक्यता आहे. भाजपने मात्र यावर तीव्र टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथ म्हमाले, काँग्रेस देशासाठी ओझे बनले आहे. राहुल गांधी अध्यक्ष बनल्यानंतर हे ओझे कमी होईल. राहुल गांधींची उमेदवारी दाखल करताना वरिष्ठ नेते कमलनाथ, शीला दीक्षित, मोतीलाल व्होरा, तरुण गोगोई हे प्रस्तावक बनले. या निमित्ताने माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही उपस्थित होते. राहुल एकटेच उमेदवार राहणार अशी दाट शक्यता आहे कारण सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. राहुल शिवाय दुसरा कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. 


राहुल यांच्या अध्यक्षपदाबाबत कोण काय म्हणाले.. 
भाजप : विदाऊट परफॉर्मन्स प्रमोशन

- केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, काँग्रेस हा राहुल गांधींचा पक्ष आहे. त्यांनी अध्यक्ष बनणे आणि उमेदवारी दाखल करणे हा त्यांचा वैयक्तीक मुद्दा आहे. ते निवडणूक आयोगाच्या दबावामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. पण एवढ्या मोठ्या पक्षातही लोकशाही नाही. 
- मोदींच्या मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, मी राहुल गांधींचे विना परफॉर्मन्स प्रमोशनसाठी अभिनंदन करतो. असे केवळ काँग्रेसमध्येच होऊ शकते. 


कांग्रेस : राहुल लाडके नेते 
- डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटले, राहुल हे पक्षातील प्राण आहेत, आणि पक्षाची महान परंपरा ते पाळत आहेत. 
- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या म्हणाले, राहुल गांधींच्या विरोधात एखाद्याला उभे राहायचे असेल तर तो तसे करू शकतो. पार्टीमध्ये अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होते. 
- पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, 100 बकऱ्यांच्या पुढे एक सिंह असला तर बकऱ्याही सिंह बनतात, 100 सिंहांसमोर एक बकरी असली तर सिंहही काही कामाचे राहत नाहीत. इते तर बब्बर शेर आहे. 
- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्ङणाले, तुम्ही मला विचाराल तर मी हेच म्हणेन की ते खूपच चांगले पंतप्रधान ठरतील. 


कमलनाथ म्हणाले, आधी BJP ला विचारा 
- पार्टीतील वरिष्ठ नेते कमलनाथ यांना जेव्हा निवड प्रक्रियेबाबत विचारले तेव्हा कमलनाथ म्हणाले, भाजपचे अध्यक्ष निवडले गेले होते का? नितिन गडकरी बॅलेट प्रॉसेसमधून निवडून आले होते का? आधी त्यांना जाऊन विचारा. 
- कांग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. करण सिंह म्हणाले, सोनियांनी काँग्रेसला वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या. आता राहुल गांधींवर पक्षाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...