आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर राहुल यांच्या हाती पक्षाची सूत्रे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहेत. त्यांना सूत्रे नकोत, असे म्हणणे चुकीचे होईल, असे काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

राहुल गांधी युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे जाऊ शकतात. आसाम निवडणुकीपर्यंत ते प्रतीक्षा करतील, असे दिसत नाही. बढती जितकी लवकर होईल, तितके चांगले आहे, असे या नेत्याने म्हटले आहे. परंतु त्यासाठी कोणतीही डेडलाइन नसल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. राहुल गांंधी ८ जानेवारीनंतर मायदेशी परततील. त्यानंतर पक्षातील संघटनात्मक निवडणुकीच्या कामकाजाला वेग येऊ शकतो. काही दिवसांसाठी युरोपला जात असल्याचे राहुल यांनी २७ डिसेंबरला ट्विट करून जाहीरपणे दौऱ्याची माहिती दिली होती. परदेश दौऱ्याची घोषणा ट्विटद्वारे करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात याविषयीची चर्चा रंगू लागली आहे.

एक वर्षासाठी टळली होती संघटनात्मक बांधणी
काँग्रेसच्या कार्यकारिणीने सप्टेंबरच्या बैठकीत संघटनात्मक निवडणूक एक वर्ष लांबवली होती. त्यावरून राहुल यांची बढती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु राहुल यांना त्या अगाेदरदेखील जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे संकेत पक्षाने दिले होते.

संपणार कार्यकाळ
सोनिया गांधी यांचा कार्यकाळ या वर्षी डिसेंबरअखेरीस संपणार आहे. संघटनात्मक निवडणूक दर पाच वर्षांनी होते. त्यात अध्यक्षाची निवड केली जाते. मे १९९८ मध्ये सोनिया गांधी यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. १२९ वर्षे जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वात दीर्घकाळ राहण्याची संधी आहे.

स्थापनादिनी संकेत :
राहुल यांना बढती देण्यासंदर्भात काँग्रेस स्थापनादिनी सोनिया गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी ‘त्यांनाच विचारा ’, असे सूचकपणे सोनिया म्हणाल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...