आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी मुलाखतीत 73 वेळा केला \'सिस्टिम\'चा उल्लेख, परिवर्तनाचा मार्ग मात्र नाही सांगू शकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये मोठे चिंतन - मनन झाल्यानंतर खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तयार झाले. या टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांना अनेक अवघड आणि अडचणीचे प्रश्न विचारले गेले. राहुल गांधी यांनी अनेक प्रश्नांची सरळ-सरळ उत्तरे देण्याएवजी गोल-गोल उत्तरे देण्यास प्राधान्य दिले. त्यांच्या मुलाखतीच्या विश्लेषणांती काही गोष्टी समोर आल्या आहेत. राजकारणातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राहुल यांच्या दृष्टीने सिस्टिममध्ये असल्याचे मुलाखतीतून जाणवते. संपूर्ण मुलाखतीमध्ये सिस्टिम या शब्दाचा वापर त्यांनी जवळपास 73 वेळा केला आहे. मात्र, सर्व समस्यांचे कारण असलेली 'सिस्टिम' कशी बदलणार याचे उत्तर काही त्यांनी दिले नाही.
राहुल गांधी टाळतात मोदींशी सरळ लढत!
मुलाखतीतून हे देखील स्पष्ट झाले, की आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची होत असलेली तुलना त्यांना पसंत नाही. देशातील सध्याच्या व्यवस्थेला ते वैतागले असून त्यांना व्यवस्था परिवर्तन करायचे आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या पक्षातील नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही त्यांनी व्यवस्थेलाच जबाबदार धरले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, सिस्टिम राहुल गांधींचा आवडता शब्द?