आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi's Interview With Bhaskar Noticed Accross The World Media

राहुल गांधी यांची ‘भास्कर’मधील मुलाखत जगभरातील माध्‍यमांत चर्चेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राहुल गांधी यांची ‘दैनिक भास्कर’मध्ये प्रसिद्ध झालेली मुलाखत जगभरातील माध्यमांमध्ये चर्चेत राहिली. जगातील दोन मोठ्या वृत्तसंस्था रॉयटर्स व एपी यांनीही ही मुलाखत ‘भास्कर’च्या हवाल्यासह प्रकाशित केली. स्ट्रेटस टाइम्स (सिंगापूर), ऑस्ट्रेलिया प्लस व एबीसी न्यूजच्या प्रतिनिधींनीही या मुलाखतीचे स्वतंत्र विश्लेषण केले.
शिवाय देशातील अनेक वृत्तवाहिन्यांनी मुलाखत घेणारे ‘दैनिक भास्कर’ समूहाचे नॅशनल एडिटर कल्पेश याग्निक यांना चर्चेसाठी बोलावले.‘ही मुलाखत घेताना त्यांचा अनुभव कसा होता, असे त्यांना विचारण्यात आले.’ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल यांनी कोणत्याही दैनिकाला दिलेली ही पहिलीच विस्तृत मुलाखत होती. मुलाखतीत राहुल यांना पंतप्रधानपदाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले,‘पक्षाने सध्या दिलेली किंवा भविष्यात सोपवली जाणारी जबाबदारी पार पाडण्यास ते तयार आहेत.’
राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या जवळ गेले - वॉल स्ट्रीट जर्नल
पक्षाचा निर्णय काय असेल हे राहुल सांगून गेले
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या प्रतिनिधीने म्हटले की, ‘भारतातील सर्वात मोठ्या हिंदी दैनिक ‘भास्कर’ला दिलेल्या दुर्मिळ मुलाखतीत राहुल त्यांच्या पक्षाचा निर्णय काय असू शकतो हे सांगून गेले. ते पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या जवळ पोहोचले आहेत. राहुल यांनी स्पष्ट संकेत दिले की, ते सर्वोच्च पद स्वीकारू शकतील.’
काँग्रेसची धुरा सांभाळण्यास आता राहुल तयार आहेत...
डेली मेलने म्हटले, ‘राहुल आपल्या राजकीय कारकीर्दीला नाट्यमय वळण देऊ पाहत आहेत. त्यांच्या पक्षाला मात मिळेल अशी चर्चा सुरू असताना ते नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहेत. ‘भास्कर’च्या मुलाखतीत ते म्हणतात की, सोनिया गांधी यांच्या हाती असलेली धुरा सांभाळण्यास ते तयार आहेत.’
राहुल यांनी केले प्रतिमा बदलवणारे वक्तव्य
द टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले, दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेत, अशीच धारणा होती. परंतु या मुलाखतीनुसार जर ते पंतप्रधानादाचे उमेदवार झाले तर विजय किंवा पराभव झाला तरी ते त्यांची प्रतिमा बदलतील. जनता त्यांना गांभीर्याने घेईल.’
जबाबदारी पार पाडण्यास राहुल तयार - अल जजिरा
आपल्या करिअरमधील सर्वात नाट्यमय घडामोडीसाठी राहुल तयार - डेली मेल
राहुल यांच्याकडून ‘केनेडी मॅजिक’सारखी अपेक्षा
अल जजिरानुसार, ‘मुलाखतीमुळे राहुल यांना पीएम पदाचा उमेदवार म्हणून पुढे करणाºया वक्तव्यांना काँग्रेसमध्ये जोर आला. काँग्रेसच्या गांधी कुटुंब केंद्रित राजकारणावर टीका होत होते. पण पक्षाची अशी अपेक्षा आहे की, अमेरिकेतील ‘केनेडी मॅजिक’ प्रमाणेच राहुल यांचाही प्रभाव दिसावा.’
पक्षाच्या सुस्तावलेल्या मोहिमेस राहुल गती देणार
रॉयटर्सनेही ‘दैनिक भास्कर’च्या हवाल्याने वृत्त दिले. ‘काँग्रेसच्या शुक्रवारच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी ‘भास्कर’ च्या मुलाखतीत आपल्या जबाबदारीवर टिप्पणी केली आहे. राहुल यांनी जबाबदारी सांभाळण्याचे संकेत दिल्याने काँग्रेसच्या सुस्त प्रचारास वेग येईल.’
आपल्या जबाबदारीचे ठोस संकेत
एनडीटीव्ही इंडियाने आपल्या वेबसाइटवर म्हटले,‘ राहुल यांच्यावर सातत्याने असे आरोप होतात की ते भविष्यातील योजनांवर भाष्य करण्यास अनुत्सुक असतात. या मुलाखतीतून त्यांनी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे ठोस संकेत दिले आहेत.’