आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी केली केदारनाथाची पूजा, म्हणाले- येथे येऊन शक्ती मिळाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी केदारनाथाचे दर्शन घेतले. मंदिराचे द्वार सकाळी 8.50 वाजता उघडले त्यानंतर काही क्षणांनीच राहुल गांधींनी पूजा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'मी कोणतीही मागणी करण्यासाठी आलो नाही. केदारनाथाकडे मी काहीही मागितलेले नाही. परंतू येथे येऊन मोठी शक्ती मिळाली.'
राहुल गांधी शुक्रवारी पाहाटे सहा किलोमीटर पायी प्रवास करुन केदारनाथ येथे पोहोचले. गुरुवारची रात्र त्यांनी गौरीकुंड आणि केदारनाथ दरम्यानच्या लिनचोली येथे मुक्काम केला होता. काँग्रेस उपाध्यक्ष गुरुवारी दिल्लीहून देहरादून आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने रुद्रप्रयागच्या गौरीकुंड येथे पोहोचले. तेथून त्यांनी केदारनाथची पदयात्रा सुरु केली. लिनचोली पर्यंतचे 11 किलोमीटर अंतर त्यांनी पाच तासात कापले.

राहुल गांधी म्हणाले, की केदारनाथाचे दर्शन घेण्याचे दोन मुख्य हेतू होते. केदारनाथ येथे आलेल्या प्रलयानंतर लोक येथे येण्यास घाबरत होते. त्यांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी मी पायी येण्याचा निर्णय घेतला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रलयानंतर भाविकांची संख्या घटली आणि येथील लोकांचा रोजगारच हिरावल्या सारखा झाला आहे. मी पायी चालत आलो तर येथील मजूर, हमाल, छोटे दुकानदार यांना फायदा होऊ शकतो. लोकांच्या मनातील भीती कमी झाली तर ते येथे येण्यास तयार होतील. त्यासाठी मी केदारनाथाच्या दर्शनासाठी पायी आलो.
राहुल गांधींसोबत अनेक नेते
राहुल गांधी यांच्या केदारनाथच्या पदयात्रे दरम्यान त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यात मुख्यमंत्री हरीश रावत, प्रदेश प्रभारी अंबिका सोनी, प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आहेत.

केदारनाथाची डोली गुरुवारी पोहोचली
केदारनाथ येथील प्रवेशद्वार उघडण्याच्या परंपरेनुसार केदारनाथाची डोली गुरुवारी गौरीकुंडाहून केदारनाथ येथे पोहोचली. गौरीकुंड येथे गौरी मातेच्या मंदिरात रात्रभर मुक्काम केल्यानंतर केदारनाथाची पूजा करण्यात आली. सकाळी आठ वाजता डोलीने प्रस्थान केले आणि सायंकाळी केदारनाथ येथे पोहोचली.
1100 लोकांनी केले रजिस्ट्रेशन
केदारनाथ यात्रेसाठी आतापर्यंत 1100 लोकांनी बायोमॅट्रिक रजिस्ट्रेशन केले आहे. त्यात स्थानिकांचा देखील समावेश आहे. बद्रीनाथ येथील द्वार 26 एप्रिल रोजी उघडले जाणार आहे.