आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi's Open Challenge To Pm Modi For The Enquiry

मोदीजी, ५६ इंची छाती दाखवा, चौकशी कराच, राहुल यांचे पीएमना खुले आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / अहमदाबाद- ‘मोदीजी,५६ इंचाची छाती दाखवा, माझ्याविरुद्ध जे आरोप करण्यात आले आहेत त्याची सहा महिन्यांत चौकशी करा आणि जर मी दोषी आढळलो तर मला खुशाल तुरुंगात टाका,’ असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटिश नागरिकत्वाच्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी खुले आव्हान दिले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात राहुल म्हणाले, मोदीजी पंतप्रधान आहेत. ते माझ्याविरुद्ध चौकशीचे आदेश का देत नाहीत? त्यांचे सरकार माझ्यावर चिखलफेक करण्यासाठी चमच्यांचा वापर करत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपाचे राहुल उत्तर देत होते. दोन दिवसांपूर्वी स्वामींनी राहुल गांधींकडे भारतीय आणि ब्रिटनचेही नागरिकत्व असल्याचा आरोप केला होता. केंद्राने त्यांचे भारतीय नागरिकत्व संसदेचे सदस्यत्वही काढून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

स्वामींचे गुरुवारी पुन्हा आरोप
सुब्रमण्यमस्वामी म्हणाले, राहुल राजकीय नेते कमी कमिशन एजंटच जास्त आहेत. केवळ पैसे कमावणे हाच त्यांच्या राजकारणाचा उद्देश आहे. गांधी कुटुंबाने (सोनिया, राहुल प्रियंका) परदेशात अडीच लाख कोटींची संपत्ती कमावली. हा पैसा भारतात आणला तर देशवासीयांना एक वर्ष प्राप्तिकर भरावा लागणार नाही.स्वामींनी राहुल यांच्यावरील आरोपाबाबत माध्यमासमोर पुराव्यादाखल दस्तएेवज सादर केले होते.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या ९८ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना आजीसोबतचे रेखाचित्र भेट दिले.