आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhis Us Visit A Forced Vacation Says Bjp

राहुल US मध्‍ये: काँग्रेसने सांगितले दौ-याचे कारण, BJP म्‍हणते- हे साफ खोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी त्‍यांच्‍या अमेरिका दौ-यामुळे वादात सापडले आहेत. गुरुवारी काँग्रेसने दावा केला की, राहुल तेथे एका कॉन्‍फरन्‍समध्‍ये सहभागी होण्‍यासाठी गेले आहेत. त्‍यांनी या कार्यक्रमाचे नाव 'वीकेंड विथ चार्ली रोज' असे सांगितले आहे. मात्र, भाजपाने हे खोटे असल्‍याचे सांगत कॉन्‍फरन्‍स तर, जून- जुलै महिन्‍यात होती, असे म्‍हटले आहे.
हा आहे नेमका वाद?
राहुल मंगळवारी अमेरिका दौ-यावर निघाले. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, ''राहुल अमेरिकेतील एसपेनमध्‍ये कॉन्‍फरन्‍समध्‍ये सहभागी होण्‍यासाठी गेले आहेत. यामध्‍ये जगभरातील शासनाचे आणि खाजगी प्रतिनिधी सहभागी होण्‍याची शक्‍यता आहे. '' कॉन्‍फरन्‍सची वेळ आणि अमेरिकेत राहुल किती दिवस राहणार याविषयी त्‍यांनी माहिती दिली नाही. त्‍यामुळे भाजपाने या दौ-यावरून विविध प्रश्‍न उपस्‍थित केले आहेत.
भाजपा म्‍हणते
* भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी सांगितले की, काँग्रेस बिहारमध्‍ये अपयशाच्‍या उंबरठ्यावर आहे. त्‍यामुळे लालू आणि नीतीश यांनी राहुल यांना सुटीवर पाठवले आहे.

* गुरुवारी भाजप नेता नरसिम्हा राव यांनी म्‍हटले, काँग्रेस खोटे बोलत आहे. राहुल ज्‍या कॉन्‍फरन्‍सचा संदर्भ देत आहेत, ती जुन- जुलै महिन्‍यातच झाली आहे.
हे आहे गोंधळाचे कारण?
* काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी मंगळवारी सायंकाळी सांगितले की, ''राहुल गांधी वैयक्‍तिक कारणांसाठी विदेशात जात आहेत. ''
* काँग्रेसच्‍या काही नेत्‍यांनी सांगितले की, राहुल गांधी यांची आजी आजारी असल्‍याने ते त्‍यांच्‍या भेटीसाठी विदेशात जात आहेत.
* राहुल गांधी यांना विरोधकांनी चांगलेच कात्रीत पकडले आहे. राहुल गांधी यांनी वारंवार सुट्यांवर जाऊन, त्‍यांना देशातील प्रश्‍नांचे गांभीर्य नाही, असे विरोधकांनी म्‍हटले आहे.