आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोपांपलीकडे कळीच्या मुद्द्यांवर राहुल - मोदींची काही मते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी राहुल गांधींना शहजादे म्हणोत की सोनिया गांधींना मॅडम किंवा राहुल गांधी भाजपला जातीयवादी संबोधत असतील; परंतु पंतप्रधानपदाच्या या दोन प्रमुख दावेदारांचा महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वत:चा असा एक खास दृष्टिकोन आहे. देशातील मतदारांना विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी ही माहिती...
देश
माझ्यासाठी देश आईसमान आहे. तिची सेवा करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठे पुण्य नाही. (7 एप्रिल)
भारत हे मधमाशांचे पोळे आहे. कोट्यवधी लोक ऊर्जेने भारलेले आहेत. सरकार आणि बिझनेस हाऊसनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (4 एप्रिल)
सत्ता
देशाला अशा सरकारची आवश्यकता आहे की ज्याचे नेतृत्व पुढे येऊन परिस्थितीशी दोन हात करेल. (15 सप्टेंबर)
सत्ता विष आहे असे आईने मला सांगितले आहे. त्यामुळे तिच्याशी जोडला जाऊ इच्छित नाही. (20 जानेवारी)
समलैंगिकता बेकायदेशीर
मोदी गप्पच राहिले. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मात्र आम्ही त्याला उचित ठरवू शकत नसल्याचे जरूर सांगितले.
हे प्रकरण व्यक्तिस्वातंत्र्याशी संबंधित आहे, असे मला वाटते. (12 डिसेंबर)
डौंडियाखेडामधील खजिन्याचा शोध
एका साधूच्या स्वप्नाच्या आधारावर हजार टन सोन्यासाठीच्या खोदकामामुळे जगभरात हसे होत आहे. (18 ऑक्टोबर)
राहुल यांनी मौन पाळले. (रेणुका चौधरींनी प्रारंभी अंग झटकण्याचा प्रयत्न केला, नंतर मात्र देशाचे भले होत असेल तर त्यास हरकत काय, असे सांगितले.)
गरिबी
माझ्यापेक्षा चांगली भूक कोणालाच समजू शकत नाही. कारण मी गरिबी पाहिलेली आहे. (27 ऑक्टोबर)
गरिबी मानसिक अवस्थेचे नाव आहे. लोकांचा आत्मविश्वास वाढवा, आपोआपच गरिबी दूर होऊन जाईल. (6 ऑगस्ट)
गाव- खेडे
गावांमध्ये मंदिरांपेक्षा जास्त गरज शौचालयांची आहे, असे मी माझ्या हिंदुत्ववादी प्रतिमेच्या विपरीत सांगू इच्छितो. (3 ऑक्टोबर)
गावात मला डास चावले. मी तेथील घाण पाणीही पिले. गावातील लोक कसे राहतात हे देशाच्या नेत्याला माहीत असलेच पाहिजे. (26 ऑक्टोबर)
जातीयवाद
हिंदू असो की मुसलमान, भुकेशी लढणे ही आमची पहिली गरज आहे. देशाचा एकच धर्म आहे, ‘इंडिया फर्स्ट’.
जातीयवादी शक्तींनीच माझ्या आजींना मारले, वडिलांची हत्या केली. एक दिवस ते मलाही मारतील, याची मला कल्पना आहे. (23 ऑक्टोबर)
टीम मोदी
० के. कैलासनाथन - महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदींना सल्ला
० ए. के. शर्मा- मोदींसाठी इंग्लिश संवादाचे काम पाहतात आणि इंग्रजी मीडियातून माहिती संकलित करतात.
० जगदीश ठक्कर- परदेशी मीडियाची माहिती देतात.
० भाग्येश झा- गुजराती मीडियासंबंधी फीडबॅक देतात.
० प्रशांत आणि प्रतीक - मोदींना सभेचे ठिकाण आणि त्या दिवसाची माहिती पुरवतात.
० हितेश पांड्या - मोदींना आलेल्या पत्रांची उत्तरे देतात, पत्रांतील माहिती मोदींना सांगतात.
० बिष्णू पांड्या - मोदींना इतिहासाशी संबंधित माहिती देतात.
० रिझवान कादरी - सरदार पटेलांवरील पुस्तकांचे लेखन. मोदींना इतिहासाची माहिती.
० हिरेन जोशी - आयटी तज्ज्ञ आहेत. नरेंद्र मोदींचे सायबर कॅम्पेन चालवतात. सोशल नेटवर्किंग टूलद्वारे मिळालेला फीडबॅक देतात.
टीम राहुल
० सॅम पित्रोदा - आर्थिक धोरणे, माहिती आणि प्रसारणासंबंधी राहुलना इनपुट देतात.
० मोहन गोपाल - संशोधन, पंचायत राज, विद्यमान राजकीय स्थिती, गावपातळीवरील संघटना बांधणीबाबत आपली मते सांगतात.
० के. राजू - एस.सी./ एस.टी. आणि ओबीसींबाबत मुद्दे सुचवतात.
० कौशल विद्यार्थी - हिंदी भाषेबरोबरच समकालीन मुद्द्यांबाबत आपला दृष्टिकोन पुरवतात.
० अलंकार सबाई - धोरणात्मक निर्णय आणि राजकीय मुद्द्यांवर सल्ला देतात.
० कनिष्क सिंह- बैठका आणि पूर्वनियोजित कार्यक्रम पाहतात. निवडणुकीची व्यूहरचना आखण्यातही मदत करतात.
० सचिन राव - संघटना आणि प्रासंगिक विषयांबाबत सल्ला नियमित सल्लामसलत.
० के. व्ही. बैजू - राहुल यांच्या दौ-यापूर्वी जागेची पाहणी करण्याचे काम करतात.