आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Not For Prime Minister Candidate, Sonia Said

पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींचा विचार नाही, कॉंग्रेसने दिला चर्चेला पूर्णविराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत काँग्रेसने गुरुवारी त्यांच्याकडे आगामी निवडणुकीसाठी प्रचार समितीचे प्रमुखपद सोपवले. प्रचार मोहीम ते सांभाळतील. गेल्या निवडणुकीत सोनिया गांधी यांनीही हीच भूमिका निभावली होती.
काँग्रेस कार्यकारिणीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. डॉ. मनमोहनसिंग यांनी हा प्रस्ताव मांडला. कार्यकारिणीच्या 16 सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. आता शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी बैठकीत राहुल यांच्या प्रचारप्रमुखपदावर शिक्कामोर्तब होईल. निवडणुकीनंतर काँगे्रस सरकार आलेच तर पंतप्रधान राहुलच असतील, असे स्पष्ट संकेत पक्षाने दिले. पं. नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची निवड निवडणुकीनंतरच झाली होती. बैठकीत सदस्यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल यांचे नाव जाहीर करावे, असा आग्रह केला. मात्र, स्वत: सोनियांनीच त्यास स्पष्टपणे नकार दिला.
* यामुळे टाळली उमेदवारीची घोषणा
कारणामागची
3 कारणे
काँग्रेस जे सांगते आहे
1. निवडणुकीआधीच उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही.
2. एखाद्या पक्षाने उमेदवार घोषित केला म्हणजे काँग्रेसनेही तोच कित्ता गिरवावा, असे नाही.
3. पूर्वापार चाललेल्या परंपरेनुसार निवडणुकीनंतरच पंतप्रधानपदाच्या नावावर निर्णय घेतला जाईल.
काँग्रेस जे लपवते आहे
1. राहुलला दावेदार केल्यास मोदींशी तुलना झाली असती. याचा फायदा भाजपलाच झाला असता.
2. मोदी व भाजपच्या निशाण्यावर राहुलच असले असते. अकार्यक्षमतेचा मुद्दा तापवला असता.
3. जर काँगे्रसने सत्ता गमावलीच तर पराभवाच्या जबाबदारीपासून राहुल यांना वाचवता येईल.
मोठी भूमिका
०निवडणुकांत काँग्रेसची सर्व जबाबदारी राहुलवरच.
०प्रचारापासून तिकीट वाटप हे सर्व राहुलच ठरवतील.
०निवडणुकांत प्रभावी व नवे मुद्दे मांडावे लागतील.
आव्हाने
०प्रत्येक सभा व भाषणात मोदींशीच तुलना होणार.
०दुरावलेल्या मतदारांना पुन्हा पक्षाशी जोडावे लागेल.
०यूपीएविरोधातील लाटेवर तोडगा काढावा लागेल.
निर्णयाचा अर्थ आणि त्याचे परिणाम
कॉँग्रेसला काय फरक पडेल?
फार मोठा फरक पडणार नसला तरी चार राज्यांतील पराभवामुळे हताश झालेल्या कार्यकर्त्यांना राहुल यांच्या नावामुळे किमान हुरूप तरी येईल.
विरोधक डावपेच बदलतील?
राहुल आणि सोनिया गांधी सुरुवातीपासूनच मोदींच्या निशाण्यावर आहेत. आताही विरोधकांचे तेच लक्ष्य राहतील.
काँग्रेसची पुढील रणनिती?
एक तर, कॉँग्रेस आपल्या यशाचे पाढे वाचेल. राहुलमुळेच हे यश मिळाल्याचा दावा करेल. मात्र, अपयश लपवतील. दुसरे म्हणजे, राहुल यांची संयमी, संवेदनशील आणि विकासाभिमुख प्रतिमा मोदींच्या तुलनेत कशी स्वच्छ आहे, याचा प्रचार.
सोनिया-प्रियंका यांची भूमिका
नवे पक्ष जोडण्याची गरज भासली तर ती जबाबदारी सोनियांवर. राहुल देशभर, प्रियंका अमेठीची भिस्त सांभाळतील.
वास्तव काय
सरकार आल्यास पंतप्रधान कोण, हे तर उघड गुपित...
सरकार आले तर कॉँग्रेसचा पंतप्रधान कोण असेल, हे ठरवण्याची गरज नसते. नेहरूजी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबाबतही हेच घडले. यावेळीही जगाला माहिती आहे, उमेदवार कोण असेल?
जनार्दन द्विवेदी, कॉँग्रेस
वर्षांमध्ये पावले पराभवाची भीती
अपयशाचे खापर फुटू नये म्हणून कॉँग्रेस राहुलना पीएम उमेदवार घोषित करण्याचे टाळत आहे.
- रविशंकर, भाजप
मोदी शेर, राहुल चिडिया : मनेका गांधी
भाजप नेत्या मनेका गांधी यांनी पुतण्या राहुल आणि पुतणी प्रियंकावर कठोर टीका केली. प्रियंकाचे ग्लॅमरही काँग्रेसला वाचवू शकत नसल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या. राहुलबाबत त्या म्हणाल्या, ‘तो 40 चोरांचा अध्यक्ष बनूनही देशाचे भले करू शकत नाहीत. राहुलला काँग्रेस 10 वर्षांपासून प्रोजेक्टच करत आहे, पण त्यातून आजवर काय मिळाले?’ राहुल गांधींशी मोदींशी तुलना होत असल्याबाबतही मनेका यांनी टीका केली. मोदी हे शेर आहेत, तर राहुल त्यांच्यासमोर चिडिया असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रत्युत्तरासाठी पाच नेते सरसावले, मनेकांच्या तोंडी मोदींचीच भाषा...
मनेका यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कॉँग्रेसचे राजीव शुक्ला, संदीप दीक्षित, ज्योतिरादित्य सिंधिया, राशीद अल्वी, फारुक अब्दुल्ला सरसावले. राजकारणात मर्यादा पाळायला हवी. मनेका यांच्या वक्तव्याने मर्यादा ओलांडल्याचे राजीव शुक्ला म्हणाले. मनेका 20 वर्षांपूर्वीची खपली काढत असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले. इतर नेत्यांचा सूरही काहीसा असाच होता. मनेकांच्या मनात राहुलबाबत असूया आहे. त्यांची भाषा ही मोदींसारखी असल्याची टीका या नेत्यांनी केली.