आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल, सोनियांनी जिंकली फुकटातच 2009 लोकसभा निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खिशातून एक पैसाही खर्च केला नव्हता. पक्ष निधीतून उभय नेत्यांनी निवडणुकीचा संपूर्ण खर्च भागवल्याची माहिती उजेडात आली आहे.

काँग्रेसचे पहिले कुटुंब म्हणून ओळखल्या जाणार्‍या गांधी घराण्याला पक्ष निधीत जास्त झुकते माप देण्यात आले. हे स्पष्ट आहे. मागील निवडणुकीतील खर्चाचा तपशील काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केला. त्यात ही बाब उघड झाली आहे. हा अहवाल पक्षाचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांनी सादर केला आहे. काँग्रेसने दोन्ही नेत्यांना सुमारे 25 लाख एवढी रक्कम दिली होती. त्यात दोघांनी अनुक्रमे रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या आंध्र प्रदेशातील उमेदवारांना केवळ साडेचार लाख रुपयांचा निधी मिळाला होता. दरम्यान, काँग्रेसला देणगीतून सुमारे 313 कोटी रुपये मिळाले होते, परंतु त्यांचा निवडणुकीतील एकूण खर्च त्याहून अधिक झाल्याचे अहवालातील आकड्यांतून स्पष्ट झाले आहे. 207 कोटी एवढी रक्कम पक्षाने जाहिरातबाजीवर खर्च केली, तर 116 कोटी रुपये वाहतूक, प्रवास आदींवर खर्च केले. 116 कोटी रुपये काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर खर्च केल्याचे अहवालातून दिसून आले आहे.


काँग्रेसचा खर्चनामा

आणखी कोण लाडके ?
काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याव्यतिरिक्त आणखी एक नेते लाडके होते, हे स्पष्ट झाले आहे. 2009 च्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर पक्षाने 15 लाख रुपये खर्च केले होते, असेही व्होरा यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या इतर लोकप्रतिनिधींसाठी पक्षाने प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च केले होते. या निवडणुकीत कपिल सिब्बल यांनी पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नव्हती. शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनीही पक्ष निधी घेतला नाही. त्यांनी पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली होती.


रक्कम कमी दाखवली ?
निवडणुकीतील खर्चावर नियंत्रण यावे यासाठी निवडणूक कायदा कठोरपणे अमलात येत असल्याने राजकीय पक्षांकडून निवडणुकीत खर्च कमी दाखवला जातो. काँग्रेसने अशाच प्रकारे खर्च दाखवलेला असावा. कारण प्रत्यक्षात लोकसभेसाठी येणारा खर्च खूप अधिक असतो, असे जाणकारांचे मत आहे.

36.91
कोटी रुपये उमेदवारांवर
380.04
कोटी रु. निवडणुकीवर एकूण


वॉलमार्ट लॉबिस्टची माहिती पीएमओने नाकारली
अमेरिकी कंपनी वॉलमार्टच्या लॉबिस्टशी पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा त्यांच्या कार्यालयातील अधिकार्‍यांची भेट झाली किंवा नाही, हे सांगण्याची पीएमओची इच्छा नाही. आरटीआय अर्जाअंतर्गत 2008 पासून आतापर्यंत पंतप्रधान आणि पीएमओच्या अधिकार्‍यांना भेटणार्‍या वॉलमार्टचे लॉबिस्ट, सल्लागार, अधिकारी व प्रतिनिधींची माहिती मागितली होती. मात्र, पीएमओने ती पुरवण्यास नकार दिला. पीएमओने पंतप्रधानांबाबत विचारलेल्या माहितीबाबत आरटीआयच्या कलम 8 अंतर्गत सूट असल्याचा हवाला देत माहिती नाकारली आहे. भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी वॉलमार्टने लॉबिंगचा प्रयत्न केल्याचे वृत्त आल्यानंतर संसदेमध्ये गदारोळ झाला होता. सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्या. मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी अहवाल सोपवला आहे. लवकरच तो मंत्रिमंडळपुढे सादर केला जाईल.