आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OROP योग्य पद्धतीने लागू करुन माजी सैनिकांना द्या दिवाळी गिफ्ट. राहुल गांधींचे मोदींना पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राहुल गांधींनी भारतीय सैनिकांच्या हक्कासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, 'वन रँक वन पेन्शन (OROP) योग्यप्रकारे लागू झाले पाहिजे, जेणे करुन सैनिकांना त्यांचा अधिकार मिळेल. जवानांना त्यांच्याच हक्काच्या पैशांसाठी आंदोलनाची वेळ येऊ नये. ओआरओपी योग्य प्रकारे लागू केले तर माजी सैनिकांनी ते सर्वात मोठे दिवाळी गिफ्ट राहिल. या माध्यमातून आपण त्यांचे आभार मानू शकतो.'
आणखी काय म्हणाले राहुल गांधी
- एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल गांधींनी शनिवारी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते.
- त्यात म्हटले आहे, की सरकारने गेल्या काही आठवड्यात घेतलेल्या निर्णयांमुळे संरक्षण खात्याचे मनोबल खच्चीकरण झाले आहे.
- पत्रात असेही म्हटले आहे, की देशाच्या संरक्षणासाठी जवान शीर हातावर घेऊन काम करताता, त्यांच्याकडे लक्ष देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...