(फाइल फोटो: राहुल गांधी)
नवी दिल्ली- गेल्या महिन्याभरापासून अज्ञातवासात गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अखेर ठावठिकाणा लागला आहे. राहुल गांधी सध्या ब्रह्मदेशात आहेत. म्यानमारमध्ये ते विपश्यना शिबिरात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विपश्यनेत आत्मनिरीक्षणाद्वारे आत्मशुद्धी केली जाते. हरवलेले मानसिक स्वास्थ्य पुन्हा मिळवता येते. या काळात साधक कुटुंबापासून अलिप्त होऊन ध्यानसाधने तल्लीन होत असतो.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीपासून राहुल गांधी सुट्टीवर गेले आहेत. मात्र, ते कोठे गेले? याविषयी कोणाला कसलीच माहिती नाही. राहुल मार्चअखेर परत येणार असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले होते. परंतु एप्रिल महिना सुरु झाल्यानंतरही राहुल गांधी यांचा ठावठिकाण्याबद्दल नेमकी माहिती समोर न आल्याने विविध तर्कवितर्क लढवले जात होते.
एवढेच नव्हे तर राहुल गांधी अचानक अज्ञातवासात गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला होता. तसेच राहुल यांची सोशल मीडियात टिंगल उडवली जात आहे. राहुल गांधी बेपत्ता, असे कार्टून बनवून सोशल मीडियात शेअर करण्यात अाले आहे.
मिळालेली माहिती अशी की, राहुल गांधी हे सध्या ब्रह्मदेशात आहेत. म्यानमारमध्ये ते आत्मशुद्धीसाठी विपश्यना करत आहेत. म्यानमारमध्ये देशातील अनेक आध्यात्मिक गुरु देखील साधनेसाठी जातात. या साधनास्थळीची निर्मिती एका प्रसिद्ध भारतीय उद्योगपतीने 10 वर्षांपूर्वी केले होते.
राहुल गांधी 14 एप्रिलला दिल्लीत परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच 19 एप्रिलला रामलीला मैदानात होणार्या शेतकरी, मजूर रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, राहुल गांधींवर सोशल मीडियात शेअर करण्यात आलेले कार्टून...