आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : ए. राजांच्या २० मालमत्तांवर छापे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीआयने २ जी स्पेक्ट्रम प्रकरणातील आरोपी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, कुटुंबीय व मित्रांसह १६ जणांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता प्रकरणीखटला दाखल केला आहे. सीबीआयने चेन्नई व तामिळनाडूमध्ये विविध जागी राजा व इतरांच्या मालमत्तांवर बुधवारी छापे टाकले.
विशेष कोर्टात खटला दाखल केल्यानंतर सीबीआयने मंगळवारी दिल्ली, चेन्नई, कोईमतूर, तिरुचिरापल्ली व पेरांबलूर येथे छापे टाकले. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सीबीआयला राजा यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आढळली होती. राजा यांच्याविरुद्ध दाखल एफआयआरमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदी आणि संबंधित कायद्यानुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
१.४५ कोटींची मालमत्ता : राजा यांनी २०१४ निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे १.४५ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या पत्नीकडे ९३.९३ लाख, तर त्यांच्या अल्पवयीन मुलीकडे १८.१५ लाखांची मालमत्ता आहे.