आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Budget Announced By Railway Minister Mallikarjun Kharge

निवडणुकीच्या ट्रॅकवर अखेरची रेल्वे: भाडे जैसे थे, महाराष्ट्राला 20 नव्या गाड्यांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणुकांच्या तोंडावर यूपीए-2 ने आपले अखेरचे आणि चार महिन्यांसाठीचे हंगामी रेल्वे बजेट बुधवारी सादर केले. रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खारगे काँग्रेसचे आणि सी.के. जाफर शरीफ यांच्यानंतरचे कर्नाटकातील दुसरे रेल्वेमंत्री. सरकारने निवडणुकीची आश्वासने दिली नाहीत आणि इरादेही दाखवले नाहीत असे हे पहिलेच रेल्वे बजेट. यात महाराष्ट्राला 20 नव्या गाड्यांची भेट मिळाली.

हंगामी बजेटची 18 पाने घेऊन खारगे सभागृहात आले होते. चार पानेही वाचू शकले नाहीत. गदारोळ झाला. यूपीएचेच चार मंत्री हौद्यात उतरले. काही खासदारही सोबत होते. तेलंगणाच्या मुद्द्यावर हा गोंधळ होता. गदारोळ एवढा वाढला की पहिल्यांदाच रेल्वेमंत्र्याला भाषण अर्धवट सोडून जावे लागले.

प्रीमियम गाड्यांचे भाडे मागणीनुसार
यंदापासून 17 मार्गांवर प्रीमियम गाड्या सोडण्यात येत आहेत. यात विमानांसारख्या सुविधा असतील. भाड्याची पद्धतही तशीच असेल. डायनामिक. म्हणजे मागणी वाढली तर भाडे वाढणार. मागणी कमी तर भाडेही कमी. तसेच तत्काळ तिकीट हवे, तर काही खास गाड्यांत फ्लॅक्सी तिकीट बुक करू शकता. त्यासाठी जादा पैसे लागतील.

माझा प्रवास
73 नव्या रेल्वे

17 प्रीमियम रेल्वे
39 एक्स्प्रेस गाड्या
10 पॅसेंजर गाड्या
04 मेमू, ञ्७ डेमू,

फेर्‍या, विस्तार, नवे मार्ग
03 रेल्वेगाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ केली गेली
03 रेल्वेगाड्यांचा विस्तार करण्यात आला.
19 नव्या रेल्वेमार्गांसाठी सर्वेक्षण सुरू होईल.
05 मार्गांवर दुपदरीकरणासाठी सर्वेक्षण होणार.

माझी सुविधा
मोबाइल

सामान्य दर्जाचे तिकीट आता मोबाइलवर मिळेल.

वेटिंग रूम
बुकिंगदेखील आता ऑनलाइन करता येणार.

तिकीट
तिकिटासाठी ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन बसवणार.

०वैष्णोदेवीसाठी रेल्वे यंदापासूनच सुरू होणार
०प्रवासात कोणत्याही स्थानकावर जेवणाच्या ऑनलाइन बुकिंगची सोय.
०जनता भोजनासाठी
51 स्थानकांवर जनआहार आऊटलेट उघडणार.
०61 स्थानकांवर एस्केलेटरची सुविधा.

माझी सुरक्षा
2310 क्रॉसिंगवर सुरक्षा रक्षक तैनात केले.
3090 क्रॉसिंग बंद, उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधले.
०आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी ट्रेनमध्ये एलपीजीचा वापर बंद होणार. रेल्वेच्या पँट्री कारमध्ये आता इंडक्शन कुकरचा वापर होणार.
०रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी अँटी कोलिजन डिव्हाइस लावण्याचे पुन्हा एकदा आश्वासन.

ट्रेन वि. प्लेन
17 मार्गांवरील एसी रेल्वेगाड्यांमध्ये विमानासारखे मागणीच्या हिशेबाने भाडे वाढणार

निवडणूक पाहून
यूपीला 11, प. बंगालला 10 रेल्वे, गुजरातेत 7 नव्या गाड्या, महाराष्ट्राला 20 नव्या रेल्वे.

दुपदरीकरण सर्वेक्षण
०परभणी- परळी ०लातूर- कुर्डुवाडी ०पुणे- कोल्हापूर

नवीन मार्गांचे सर्वेक्षण
०घाटनांदूर- श्रीगोंदा रोड/दौंड व्हाया केज, मांजरसुंबा, पाटोदा आणि जामखेड ०पुणे-नगर ०कराड-पंढरपूर ० मिरज-जत-विजापूर ०पुणे-सासवड-बारामती
०नांदेड-औरंगाबाद आणि औरंगाबाद-परभणी-परळी-रेणीगुंटा नवी एक्स्प्रेस

9 प्रीमियम एक्स्प्रेस : ०हावडा-पुणे एसी एक्स्प्रेस मार्गे मनमाड- नागपूर (आठवड्यातून दोनदा) ०मुंबई-हावडा एक्स्प्रेस मार्गे नागपूर (आठवडी) ०मुंबई-पाटणा एक्स्प्रेस (आठवडी) ०बांद्रा -अमृतसर (आठवडी) ०पाटणा- बंगळुरू एक्स्प्रेस मार्गे नागपूर(आठवडी) ०मुंबई- गोरखपूर (आठवड्यातून दोनदा) ०यशवंतपूर-कटरा मार्गे नागपूर (आठवडी) ०निझामुद्दीन-मडगाव मार्गे वसई रोड (आठवडी) ०यशवंतपूर-जयपूर मार्गे पुणे, वसई रोड (आठवडी)

11 एक्स्प्रेस गाडया : ०नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस (आठवडी) ०औरंगाबाद-रेणीगुंटा एक्स्प्रेस मार्गे परभणी (आठवडी)
०बांद्रा टर्मिनस- लखनऊ (आठवडी) ०गोरखपूर-पुणे (आठवडी) ०हुबळी-मुंबई मार्गे सोलापूर (आठवडी) ०कानपूर-बांद्रा टर्मिनस (आठवडी) ०मुंबई-चेन्नई मार्गे पुणे (आठवडी) ०मुंबई-गोरखपूर (आठवडी) ०मुंबई-करमळी (गोवा) एक्स्प्रेस मार्गे रोहा (आठवडी) ०नागपूर-रेवा (आठवडी) ०पुणे-लखनऊ (आठवडी)

पुणे मेट्रोला मान्यता
नगरविकास मंत्रालयाने पुणे मेट्रोला मान्यता दिल्याची घोषणा बजेटमध्ये झाली. 31.51 कि.मी.प्रकल्पाच्या पहिल्या कॉरिडॉरमध्ये पिंपरी चिंचवड मनपा-स्वारगेट हा 16.5 कि.मी., 14.92 कि.मी.चा वनाज-रामवाडी असा दुसरा कॉरिडॉर तयार होईल.