आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail Budget: Suresh Prabhu's Tough Tightrope Walk With Finances

रेल्वे अर्थसंकल्प आज : भाडेवाढ न करता 3 लाख कोटी रुपये कमावण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून गुरुवारी सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प ग्राहकांच्या खिशातून 3 लाख कोटी रुपये काढेल. व्यवस्थापन आणि पॅकेजिंगच्या झगमगाटात कदाचित हे लक्षात येणार नाही. रेल्वेचे चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न ३.७७ टक्क्यांनी कमी झाले आहे. म्हणजे सुमारे लाख १७ हजार कोटी रुपये. त्यामुळे ऑपरेटिंग रेश्यो रुपयावर ९२ पैसे या कमाल स्तरावर गेला आहे. म्हणजे रेल्वेला ९२ पैसे खर्च केल्यानंतर रुपयाचे उत्पन्न मिळते. सूत्रांनुसार, रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, चालू आर्थिक वर्षात हा तोटा कमी करायचा आहेच शिवाय लाख कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळवायचे आहे. तेही भाडेवाढ करता. त्यामुळे भाड्याच्या समायोजनाच्या नावाखाली प्रवास महाग करण्याच्या तरतुदी बजेटमध्ये असू शकतात.

या मार्गे खिसा कापण्याची तयारी
- पसंतीच्या आसनासाठी, प्रवासाच्या तारखेच्या जवळपास कन्फ्रर्म सीट घेतल्यास अतिरिक्त रकमेची तरतूद.
- तिकिटांवर मिळणारी सवलतही कमी होऊ शकते किंवा त्याचे नियम कडक होऊ शकतात.
- केटरिंग, कुरिअर आणि लगेज सर्व्हिस महाग होऊ शकते.
- काही खास नव्या गाड्यांची घोषणा शक्य.

या घोषणाही शक्य
- भाड्याऐवजी अधिभारात वाढ.
- मालभाड्याचे समायोजन. काही सेवा कायम तर काहींमध्ये भाडेवाढ.
- काही नव्या गाड्यांची घोषणा शक्य.
- प्रमुख गाड्यांत एक अतिरिक्त जनरल डबा लावण्याची घोषणा.
- सवलतीचे तिकीट किंवा सुविधांत कपात.
- चालू वर्षात मानवरहित लेव्हल क्रॉसिंग थांबवण्याची घोषणा.
- तिकीट रद्द करणे, सुविधांसाठी द्यावे लागेल अतिरिक्त रक्कम.