नवी दिल्ली- रेल्वे नीर घोटाळ्यात रेल्वे केटरर्सवरील धाडीत जप्त २७ कोटी रुपयांच्या रोकडमध्ये चार लाखांच्या नोटा बनावट आढळल्या. ही रोकड मोजायला सीबीआयने मोजणाऱ्या यंत्रांसह ५ अधिकाऱ्यांना जुंपले होते. तरीही तब्बल १५ तास मोजदाद चालली. सूत्रांनुसार, आर.के. असोसिएट्स व वृंदावन फूड्सचे मालक श्यामबिहारी अग्रवाल कुटुंबाच्या घरांतून २० कोटी जप्त करण्यात आले.
घोटाळा : २०१२ मध्ये स्वस्त ब्रँडचे पॅकेज्ड वॉटर रेल्वे नीरच्या दरांवर विक्री.