आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Board Decided Passengers In Reserved Coaches Can Only Sleep Between 10 Pm And 6 Am

प्रवाशांच्या झोपेवर रेल्वेचा कडक नियम, लोअर-मीडल बर्थसाठी रात्री 10 ते सकाळी 6 ही वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजारी व्यक्ती, दिव्यांग आणि गर्भवती महिलांना या नियमातून सुट देण्यात आली आहे. - Divya Marathi
आजारी व्यक्ती, दिव्यांग आणि गर्भवती महिलांना या नियमातून सुट देण्यात आली आहे.
नवी दिल्ली- रेल्वेने आता आरक्षित डब्ब्यांमध्ये झोपण्याची वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या डब्ब्यांमध्ये रात्री 10 ते 6 या वेळेतच झोपता येणार आहे. डब्ब्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना बसायला मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

31 ऑगस्टला काढण्यात आले परिपत्रक
- रेल्वे बोर्डाने 31 ऑगस्टला याबाबतचे परिपत्रक काढले आहे. या अंतर्गत आता लोअर आणि मिडल बर्थवाल्यांना केवळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यतच झोपता येणार आहे. काही व्यक्तींना मात्र यात सुट देण्यात येणार आहे.
- आजारी व्यक्ती, दिव्यांग आणि गर्भवती महिलांना यातून सुट देण्यात आली आहे.

काय होता जुना नियम
- यापूर्वी झोपण्याची वेळ रात्री 9 ते सकाळी 6 अशी होती. नव्या नियमानुसार आता वेळ बदलण्यात आली आहे.
- रेल्वेचे प्रवक्ते अनिस सक्सेना यांनी सांगितले की, झोपण्याच्या व्यवस्थेविषयी आमच्या अधिकाऱ्यांना फिडबॅक मिळाला होता. आम्ही पहिल्यादा नियम बनवला होता. आता या नियमाचे पालन करणे गरजेचे होते.
- आरक्षित सर्वच डब्ब्यांमध्ये आता हा निर्णय लागू होणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...