आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Bribery Case: CBI Set To Question Ex minister Pawan Bansal

बढती घोटाळा : रेल्वे भवनातील फायली जप्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे लाचखोरी प्रकरणात पुरावे मिळवण्यासाठी सीबीआयचे पथक सोमवारी रेल्वे मंत्रालयात धडकले. बढत्या, बदल्या आणि निविदांशी संबंधित सर्व फायली पथकाने जप्त केल्या आहेत. सीबीआय सूत्रांनुसार, माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्याविरुद्ध पुरावे हाती लागल्यानंतर त्यांची चौकशी होऊ शकते.

गेल्या तीन वर्षांत रेल्वे मंत्रालयामार्फत करण्यात आलेल्या बदल्यांची माहिती सीबीआयने मागितली आहे. यातून रेल्वे लाचखोरीबाबत काही माहिती हाती लागू शकते. त्याच आधारे नंतर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.

या लाचखोरी प्रकरणातील आरोपांनुसार रेल्वे बोर्डाचे सदस्य महेश कुमार यांच्या विद्युत विभागात बदलीसाठी तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याने 10 कोटींचा सौदा केला होता. या प्रकरणी सिंगलासह आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयातील अधिकार्‍यांना नोटिसा
सीबीआयने रेल्वे मंत्रालयातील काही अधिकार्‍यांना पूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. सीबीआयकडे असलेल्या 1 हजार फोन कॉल्समध्ये ज्यांची नावे आली आहेत त्या सर्वांची चौकशी होऊ शकते. सिंगला, महेश कुमार, मंजुनाथ आणि संदीप गोयल या चौघांतील संभाषणांच्या फोन कॉल्सची माहिती सीबीआयकडे असून रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनय मित्तल यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण? : रेल्वे बोर्डाचे सदस्य महेश कुमार याला बढती देण्यासाठी पवनकुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंगला यास 90 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने अटक केली होती.