आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक अर्थसंकल्पात रेल्वे बजेटचा समावेश, आज होणार निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचा वार्षिक अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट वेगवेगळे मांडण्यापेक्षा दोन्ही अर्थसंकल्प एकत्रित मांडण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बुधवारी निर्णय घेणार आहे. हा निर्णय झाला तर गेल्या ९२ वर्षांपासून जनरल बजेट व रेल्वे बजेट वेगवेगळे मांडले जाण्याची परंपरा थांबणार आहे. हा बदल करण्याच्या दृष्टीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यापूर्वीच सहमती दर्शवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पातळीवर हा निर्णय होण्यात आता कोणत्याही अडचणी नाहीत. १ फेब्रुवारी रोजीच हे दोन्ही अर्थसंकल्प मांडले जावेत, अशी ही योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...