आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंगामी रेल्वे बजेट आज, नव्या गाड्यांची घोषणा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकार बुधवारी अखेरचा रेल्वे अर्थसंकल्प सादर करील. हे हंगामी अंदाजपत्रक असले तरी निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे लोकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. भाडे कमी होणे दुरापास्त आहे, पण काही नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा होऊ शकते.

मल्लिकार्जुन खारगे यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, गाड्यांची घोषणा करताना आघाडीतील सर्व घटक पक्षांकडे त्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. नव्या रेल्वेगाड्या, गाड्यांचा विस्तार, अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने माहिती व्यवस्थेत सुधारणा अशा घोषणा असतील. रेल्वेचा खर्च वाढत असल्याची मोठी अडचण खारगे यांच्यासमोर आहे. एप्रिल-डिसेंबरदरम्यान खर्च बजेटपेक्षा 5 हजार कोटींनी वाढला आहे. याशिवाय उत्पन्नात 3 हजार कोटींची घसरण झाली आहे. मालवाहतुकीचेही निर्धारित उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळणे कठीण आहे.