आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे बजेटची विशेष गाडी बंद, सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबत होणार सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे बजेट आता सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबत सादर होणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबत सादर करण्याला मंजूरी देण्यात आली. या मंजुरीमुळे 92 वर्षांची परंपरा संपुष्टात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेटने बजेट सादर करण्याच्या तारखेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 28 फेब्रुवारी ऐवजी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल.
काय म्हणाले अर्थमंत्री
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, 'रेल्वे बजेट यापुढे सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबत सादर केले जाईल. रेल्वे स्वायत्त राहील त्यात काहीही बदल होणार नाही.'
- सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या एक्सपेंडीचर आणि नॉन-एक्सपेंडीचर खर्चाचा तपशील राहील.
- रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, 'यामुळे रेल्वेला काय फायदा होणार याचा विचार करुनच हा निर्णय घेतला गेला आहे.'
बातम्या आणखी आहेत...