आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Corruption Matter Get New Turn, Accused Mahesh Kumar Change His Birth Date

चेअरमन बनण्‍यासाठी महेश कुमारने बदलली जन्‍मतारीख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रेल्‍वे लाचप्रकरणी आता नवा खुलासा बाहेर आला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्‍या वृत्तानुसार रेल्‍वे बोर्डचे निलंबित सदस्‍य महेश कुमार यांनी चेअरमन बनण्‍यासाठी जन्‍मतारखेमध्‍ये बदल केला होता.

वृत्तपत्रानुसार, सरकारी नोंदीप्रमाणे महेश कुमार यांची जन्‍मतारीख 15 मे 1955 ऐवजी 15 जुलै 1955 करण्‍यात आली. जन्‍मतारखेत बदल केल्‍यास महेश कुमार यांना रेल्‍वे बोर्डचे चेअरमनपद मिळण्‍याची योग्‍यता प्राप्‍त झाली असती. येत्‍या 30 जूनला विद्यमान चेअरमन विनय मित्तल हे निवृत्त होणार आहेत.

रेल्‍वे बोर्डचे चेअरमनपद मिळवण्‍यासाठी उमेदवाराची दोन वर्षे नोकरी राहिली पाहिजे. तसेच त्‍याच्‍याकडे जनरल मॅनेजर या कामाचा एक वर्षांच्‍या अनुभवाची आवश्‍यकता लागते. महेश कुमार यांनी जनरल मॅनेजरपदी काम केल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे ही योग्‍यता होती. मात्र, जन्‍मतारीख 15 मे 1955मुळे ते 15 मे 2015 रोजी निवृत्त झाले असते.

जन्‍मतारखेत बदल केल्‍यामुळे ते 15 जुलै 2015 मध्‍ये निवृत्त झाले असते. म्‍हणजे त्‍यांच्‍याकडे दोन वर्षांची नोकरी शिल्‍लक राहिली असती. त्‍यामुळे रेल्‍वे बोर्डाचे चेअरमनपद मिळवण्‍यासाठी पात्र ठरले असते.