आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Railway Fare News In Marathi, Divya Marathi, Manoj Sinha, Railway State Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझेल दराच्या किमतींवर रेल्वे भाड्यात वर्षातून दोन वेळा होऊ शकते!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ देशभरात शनिवारी उग्र निदर्शने झाली. काँग्रेस, माकपसह विरोधकांनी धरणे, निदर्शने, रेल रोको करून संतापाला वाट मोकळी करून दिली. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी डिझेल दराच्या किमतींवर रेल्वे भाड्यात वर्षातून दोन वेळा वाढ होऊ शकते, असे विधान करून विरोधक संताप व्यक्त करीत असताना त्यात काडी टाकली.

अर्थमंत्री अरुण जेटली भाडेवाढीचे जोरदार समर्थन करीत असतानाच रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, डिझेल किमतीआधारे वर्षभरात दोन वेळा भाडेवाढ करण्याचा निर्णय तर आधीच झाला आहे. त्यावर काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी खोचक ट्विट केले. देश चालवणे आणि चुका शोधणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. सत्तेवर असो वा विरोधक एक नेता म्हणून आपण सत्य सांगितले पाहिजे. मोदींना याची जाणीव आता झाली असेल असे दिग्विजय म्हणाले. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रात्री प्रवासी भाड्यात 14.2 टक्के, तर मालभाड्यात 6.5 टक्के वाढ केली आहे. ही दरवाढ 25 जूनपासून लागू होणार आहे. सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, डाव्या पक्षांसह सर्वच विरोधी पक्षांनी भाडेवाढीस विरोध केला आहे.
डिझेल किमतींच्या आधारे वर्षभरात दोन वेळा दरवाढ होऊ शकते - मनोज सिन्हा
शिवसेनेचाही विरोध २ सरकारच्या निर्णयावर सत्तेत सहभागी असलेल्या रालोआतील पक्षांनीही विरोध दर्शवला आहे. भाडेवाढ जास्त झाली. सरकारला प्रथम श्वेतपत्रिका आणणे आवश्यक होते. नंतर ब्लूप्रिंट आणली असती तर जनतेने आक्षेप घेतला नसता असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. रालोआतील घटक पक्ष डीएमडीके आणि एमडीएमके पक्षांनीही भाडेवाढ तत्काळ मागे घेण्याची विनंती केली आहे.

भाजप-सपा कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक
भाडेवाढीच्या निषेधार्थ दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत आंदोलने झाली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सपा कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली.त्या वेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली.लाठ्या-काठ्यांनी हाणामारी, दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. वाराणसीत सपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला. दिल्लीमध्ये काँग्रेसने उग्र निदर्शने केली. केरळातही काँग्रेस कार्यकर्त्यानी रेल रोको आंदोलन केले. डाव्या पक्षांनी कोलकात्यात निदर्शने केली.

सिलिंडरच्या किमतीत दरमहा 10 रु. वाढ
स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत दरमहा दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकार घेऊ शकते, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यामुळे सरकारच्या तेल अनुदानावरील खर्चात 7 हजार कोटी रुपयांनी बचत होणार आहे. सध्या प्रत्येक
कु टुंबाला 12 सिलिंडर सबसिडीचे मिळतात.

सरकारचा युक्तिवाद
हा निर्णय यूपीए सरकारचा आहे.
पाच फेब्रुवारी रोजीच यूपीए सरकारने रेल्वे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रेल्वेच्या महसुलात दरवर्षी 7900 कोटी रुपये वाढ होणार आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी त्यास मंजुरी दिली होती. अरुण जेटली, अर्थमंत्री ( आपल्या फेसबुकपेजवर )

यूपीए सरकारचा परिणाम वर्षभर राहील
मागील सरकारच्या निष्क्रियपणाचा परिणाम पुढील एकवर्ष जाणवणार आहे. महागाईसुद्धा आणखी काही महिने कायमच राहील. त्याला रोखण्यासाठी सरकार कसून प्रयत्न करीत आहे.
राजनाथसिंह, गृहमंत्री