आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या कामाची बातमी: वाचा, LPG सबसिडी सोडावी लागणार, रेल्वे-फोन-हॉटेल महाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद/कोलकाता- वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांची एलपीजी गॅस सबसिडी बंद होऊ शकते. नगरविकास व संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, सरकार सध्या या प्रस्तावावर विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानही म्हणाले, जास्त कमाई असणाऱ्यांची गॅस सबसिडी बंद करण्यावर विचार झाला पाहिजे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात नायडू म्हणाले, 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांना अनुदानाची काय गरज? मंत्र्यांना सबसिडी कशासाठी? आतापर्यंत लाखाे लाेकांनी स्वेच्छेने सबसिडी सोडली आहे. ती गरिबांना दिली जाईल. पेट्रोलियम मंत्री म्हणाले, सक्षम ग्राहकांनी एलपीजी सिलिंडरची सबसिडी सोडून द्यायला हवी.

पुढील स्लाइडमध्ये, आजपासून रेल्वे तिकीट, हॉटेल, फोन बिल महाग